अजय देवगणने अलीकडेच त्याच्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2012 मध्ये आला होता ज्याचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केले होते. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी मृणाल ठाकूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तही या चित्रपटाचा एक भाग असणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार
आता चित्रपटातील इतर कलाकारांबाबतही अनेक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते चित्रपटात मोठी स्टारकास्ट आणण्याची योजना आखत आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, विजय राज, रवी किशन, चंकी पांडे, नीरू बाजवा, दीपक डोबरियाल, कुब्बरा सैत, विंदू दारा सिंह, मुकुल देव, शरत सक्सेना, रोशनी वालिया आणि अश्विनी काळसेकर देखील ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट असणार आहे.
इतक्या मोठ्या कलाकारांसह, निर्माते चित्रपटात भरपूर विनोद आणि मनोरंजन जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपटाचे शूटिंग सध्या स्कॉटलंडमध्ये सुरू असून ते ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर उर्वरित शूटिंग मुंबईत होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करणार आहेत. मूळ चित्रपटाच्या 12 वर्षांनंतर हा चित्रपट येत आहे. पहिल्या चित्रपटात संजय दत्तने सोनाक्षी सिन्हाच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती, ज्याच्याकडून अजय देवगण लग्नासाठी सोनाक्षी सिन्हाचा हात मागण्याचा प्रयत्न करतो. असे या चित्रपटाच्या पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काय पाहायला मिळणार आहे याची चाहत्यांना आतुरता आहे.
हे देखील वाचा- विजय वर्माच्या ‘IC814’ सिरीजचा टीझर प्रदर्शित, दिसणार कंदहार विमान अपहरणाची कथा!
अजय देवगणचे आगामी चित्रपट
‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त अजय देवगणचे पाइपलाइनमध्ये इतर प्रोजेक्ट्स देखील आहेत ज्यात सिंघम अगेन, रेड 2, दे दे प्यार दे, टोटल धमाल आणि गोलमाल 5 यांचा समावेश आहे. हे सगळे चित्रपट घेऊन तो लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.