फोटो सौजन्य - Social Media
साऊथचा सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या ‘गेम चेंजर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘पुष्पा 2 द रुल’चे दिग्दर्शक सुकुमारही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमेरिकेत गेले होते. यादरम्यान सुकुमारने शंकर दिग्दर्शित राम चरण आणि कियारा अडवाणी अभिनीत ‘गेम चेंजर’चा पहिला रिव्ह्यू दिला आहे. शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात दिग्दर्शकाने दावा केला की, ‘रामने इतका चांगला अभिनय केला आहे की त्या अभिनेत्याला त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल अशी आशा आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे.
सुकुमार यांनी चित्रपटाचे कौतुक केले
सुकुमारने कार्यक्रमात सांगितले की, त्याने हा चित्रपट राम चरणचे वडील आणि अभिनेता चिरंजीवी यांच्यासोबत पाहिला. हा चित्रपट कसा आवडला हेही त्याने सांगितले. चाहत्यांशी बोलताना सुकुमार म्हणाले, ‘मी तुम्हाला एक गुपित सांगतो. गेम चेंजर या चिरंजीवी सरांसोबत मी हा चित्रपट पाहिला, त्यामुळे मला पहिला रिव्ह्यू द्यावासा वाटतो. पहिला भाग, अप्रतिम. मध्यांतर, ब्लॉकबस्टर. माझ्यावर विश्वास ठेवा. दुसरा भाग, फ्लॅशबॅक एपिसोडने मला आश्चर्यचकित केले. शंकराच्या ‘जंटलमन’ आणि ‘इंडियन’इतकाच मला आनंद झाला.’ असे दिग्दर्शकाने सांगितले.
‘रंगस्थलम’ला पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा होती
‘रंगस्थलम’ चित्रपटामधील अभिनयासाठी रामला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल अशी आशा होती आणि तसे झाले नसले तरी हा चित्रपट त्याचे स्वप्न पूर्ण करेल, असा दावाही दिग्दर्शकाने केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, ‘रंगस्थलमसाठी राम चरणला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल याची मला खात्री होती, इतरांनाही असेच वाटले, परंतु चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये त्यांनी ज्या प्रकारे भावनांचे चित्रण केले त्यामुळे मला पुन्हा तेच वाटले. त्याने इतका चांगला अभिनय केला आहे की त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळेल.’ असे त्यांनी पुन्हा या प्रोमोशनदरम्यान सांगितले.
BIGGG NEWS… RAM CHARAN – SUKUMAR – MYTHRI REUNITE FOR NEW PROJECT… #RamCharan teams up with #Rangasthalam director #Sukumar, music composer #DSP and producers #MythriMovieMakers for his next film, not titled yet.
Scheduled to commence production later this year, the film will… pic.twitter.com/vivKzOUUIX
— taran adarsh (@taran_adarsh) March 25, 2024
सुकुमारचा लवकरच रान चरणसह करणार चित्रपट
दिग्दर्शक सुकुमार यांच्या पुढच्या चित्रपटात राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहे, हा त्यांचा ‘रंगस्थलम’ नंतरचा दुसरा चित्रपट आहे. कार्यक्रमात सुकुमार म्हणाला, ‘मी ज्या हिरोसोबत काम करतो त्या प्रत्येक नायकावर मला प्रेम आहे, कारण आम्ही किमान तीन वर्षे एकत्र काम केले आहे, पण चित्रपट रिलीज झाल्यावर मी त्यांच्यापैकी बहुतेकांच्या संपर्कात नाही. रंगस्थलमनंतरही राम चरण आणि मी संपर्कात राहिलो. तो माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. आम्ही अनेकदा भेटतो आणि अनेक गोष्टींवर चर्चा करतो.’ असे त्यांनी सांगितले.
अभिजित भट्टाचार्य यांनी सलमानवर साधला निशाणा, सिंगरचा वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
सुकुमार यांची कारकीर्द
दिग्दर्शक सुकुमारने अलीकडेच पुष्पा 2: द रुल दिग्दर्शित केले होते ज्यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला, परंतु मुख्य अभिनेता रिलीज झाल्यापासून कायदेशीर समस्यांमध्ये अडकला आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, अल्लू अर्जुनला अटक करून अंतरिम जामिनावर सोडण्यात आले आहे. सुकुमार हे साऊथ चित्रपटसृष्टीतील खूप मोठे दिग्दर्शक आहेत, त्यांचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात.