प्रशिक्षणाला २,०१६ कर्मचारी दांडीबहाद्दर! आयुक्त जी. श्रीकांत आक्रमक (Photo Credit - X)
बंधनकारक होते प्रशिक्षण
शहरातील विविध प्रभागांमध्ये ८,००० मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व संबंधित अधिका-यांसाठी प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले होते. रविवारी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रशिक्षण सत्रे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ८ याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकी १,००० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले.
तपासणीनंतर सत्य उघड
चारही प्रशिक्षण केंद्रांवर उपस्थितीची तपासणी केल्यानंतर गैरहजेरी समोर आली. त्यामुळे आता या गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर संबंधित विभाग काय कारवाई करणार किंवा नुसते नोटिस बजावणार हे पहावे लागले.
ईव्हीएम हाताळणीवर भर
प्रशिक्षणादरम्यान मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची हाताळणी, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, मतदान दिवशी घ्यावयाची खबरदारी तसेच आकस्मिक किंवा आपत्कालीन परिस्थितीत अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
गरज पडल्यास गुन्हे दाखल करा
आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या सर्व २,०१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. कामकाजात कसलीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. प्रशिक्षणाला जाणीवपूर्वक गैरहजर राहणाऱ्यांवर गरज पडल्यास गुन्हे नोंदवा.






