फोटो सौजन्य - YouTube/सोशल मीडिया
अभिजित भट्टाचार्य पॉडकास्ट : प्रसिद्ध बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य नेहमीच आपल्या आवाजाच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकतात. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अभिजीतने एक हजारहून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. त्यांचे भारतामध्ये अनेक कॉन्सर्ट होत असतात यामध्ये त्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. बादशाह सारखं गाण्याने त्यांना ओळख दिली आहे. त्याचबरोबर अभिजीत त्याच्या गाण्यांसोबतच त्याच्या स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता सोशल मीडियावर एक त्यांचा पॉडकास्ट प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये त्यांनी बॉलीवूडच्या स्टार कलाकारांवर निशाणा साधला आहे आणि वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
अलीकडेच अभिजीतने सलमान खानसाठी असे काही केले, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिजीत भट्टाचार्य नुकताच शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर दिसला. यावेळी त्याने त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोकळेपणाने बोलले. मुलाखतीत शुभंकरने अभिजीतला सलमान खानच्या नावाबाबत विचारले असता, सांगितले की अभिजितने सगळ्या खानसोबत वक्तव्य केली आहेत. गायकाने सर्वप्रथम त्याला विषय बदलण्यास सांगितले. यानंतर तो म्हणाला, ‘सलमान खान अजूनही त्या स्तरावर आला नाही की मी त्यांच्याबद्दल चर्चा करू शकतो.’
अभिजीत पुढे म्हणाला की, शाहरुख खान ‘वेगळ्या लेवलचा’ आहे. माझ्या त्याच्याशी जे काही प्रश्न आहेत ते फक्त कामाशी संबंधित आहेत. त्याचवेळी हिट अँड रन प्रकरणावर बोलताना सलमान खानला प्रश्न विचारला असता, त्याने आधी विषय बदलण्यास सांगितले, पण नंतर म्हणाले, ‘मी त्याला कधीच सपोर्ट केला नाही. मी फक्त म्हणालो की रस्त्यावर कोणी झोपले तर कोणीतरी दारू पिऊन व्यक्ती येईल आणि तुमच्या अंगावरून गाडी नेऊन तुम्हाला मारू शकतो. त्याला मी कधीही साथ दिली नाही.
याच मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य सलमानसाठी पुढे म्हणाले, ‘मी म्हणालो होतो की आम्ही रस्त्यावर झोपू… त्याआधीही बातमीत पहा की एका ट्रकने 4 लोकांवर धाव घेतली. हे रोजच घडत आहे, माणूस रस्त्यावर झोपला आहे, फूटपाथवरही तो सुरक्षित नाही. मी म्हणालो रस्त्यात झोपलात तर दारू पिऊन येईल. तुमच्यावर गाडी चालवेल. रस्त्यावर कुत्र्यासारखे झोपलेले असाल, तर एक मद्यपी येईल, एक मद्यपी येऊन आणि जर तुम्ही रस्त्यावर झोपला असाल तर तो तुम्हाला मारू शकतो. मी कशाला अडकू?’ अभिजीतची ही मुलाखत वेगाने व्हायरल होत आहे.
या पॉडकास्टमध्ये त्यांनी शाहरुख संदर्भात मुलाखतीच्या संदर्भात सुद्धा खुलासा केला आहे. सध्या त्यांची ही मुलाखती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.