(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन हे प्रतिष्ठित प्रेमकथा सादर करण्यासाठी खूप प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. या धर्मा प्रॉडक्शनने ‘कभी अलविदा ना कहना’, ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम’ कथा असे लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. आता प्रॉडक्शन हाऊस आणखी एका रोमँटिक प्रेमकथेसह परतले आहे. यामध्ये अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य सोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘चांद मेरा दिल’ हे असून, या चित्रपटाचा नुकताच नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटामध्ये हे कलाकार करणार मुख्यभुमिका
करण ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटासोबत कमबॅक करतो आहे. यावेळी चित्रपटात अनन्या पांडे आणि लक्ष्य मुख्य भूमिकेत दिसणार असून, समीक्षकांनी प्रशंसित किलमध्ये लक्ष्य लालवानीची मुख्यभुमिका पहिली होती. आणि त्यासाठी अभिनेत्याचे खूप कौतुक देखील करण्यात आले आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर चार पोस्टर शेअर केले आहेत, ज्यातील प्रत्येक पोस्टरमध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18: ‘बिग बॉस 18’ मध्ये अखेर सुरु झाली नवी प्रेमकहाणी; अविनाश मिश्राने ईशा सिंगला केले इम्प्रेस!
कॅप्शन शेअर करून करण जोहरने लिहिले, “हमारे दो चांद तुमच्यासाठी एक उत्कट आणि अप्रतिम कथा आणण्यासाठी तयार आहे! प्रेमात वेडं व्हावंच लागत…अनन्या पांडे आणि लक्ष्य ‘चांद मेरा दिल’मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २०२५मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे”. असे लिहून अभिनेत्याने हे पोस्टर शेअर केले आहे.
पहिल्या पोस्टरमध्ये, अनन्या आणि लक्ष्य आरामदायी स्वेटरच्या मागे अर्धा चेहरा लपवताना दिसत आहेत. दुस-या पोस्टरमध्ये या जोडप्यामधली एक जिव्हाळ्याची सेटिंग दाखवण्यात आली आहे. एका छोट्या खोलीत लक्ष्य अनन्याच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसतो आहे. अभिनेत्रीने कुर्ता परिधान केला आहे. पोस्टरमध्ये दोघेही रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहेत.
हे देखील वाचा- 63 वर्षीय अभिनेता सुनील शेट्टी यांचा सेटवर अपघात, सोशल मीडियावर सांगितली कशी आहे तब्येत!
चित्रपट कधी प्रदर्शित होणार
‘चांद मेरा दिल’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी विवेक सोनी यांनी घेतली असून करण जोहर या या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही परंतु पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. अनन्या पांडे यापूर्वी नेटफ्लिक्स, सीटीआरएल आणि कॉल मी बे वर प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटासाठी अभिनेत्रीचे खूप कौतुक झाले होते. लक्ष्य लालवानी शेवटचा ‘किल’ चित्रपटात दिसला होता. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटामधील त्याचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला.