(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सुनील शेट्टी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. ९० च्या दशकात जेव्हा सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान इंडस्ट्रीत खळबळ करत होते, त्या काळात त्याने एक दमदार अभिनेता म्हणून आपले स्थान निर्माण केले होते. पण सध्या आता या अभिनेत्याबद्दल एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी यांचा सेटवर छोटा अपघात झाला आहे आणि त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. अभिनेत्याने ही माहिती त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर केली असून, चाहत्यांना त्यांच्या तब्येतेची अपडेट देखील दिले आहेत.
सुनील शेट्टी झाले सेटवर जखमी
सुनील शेट्टीने ॲक्शन हिरो म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आता वयाच्या ६३ व्या वर्षीही त्याला आपली ओळख कायम ठेवायची आहे. म्हणूनच, अभिनेता आगामी वेब सीरिज हंटरच्या सीझन 2 चे शूटिंग करत आहे आणि याच शूटिंग दरम्यान ॲक्शन सीन सेट करत असताना त्यांचा मोठा अपघात झाला, ज्यामध्ये ते जखमी झाले आहेत. सुनील शेट्टी यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे अभिनेता सध्या चर्चेत आहे. आणि चाहत्यांना त्यांची काळजी वाटू लागली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
हे देखील वाचा- ‘सलमान खान-लॉरेन्स बिश्नोईवर गाणे लिहिणाऱ्याला महिनाभरात…’, सलमानला लॉरेन्स गँगकडून पुन्हा धमकी
या प्रकरणाबाबत, अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीनतम पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, ‘या क्षणी मी ठीक आहे, मला फक्त एक किरकोळ दुखापत झाली आहे, फार गंभीर काहीही नाही. यानंतर मी पुढच्या शूटसाठी तयार आहे. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.’ असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
अशाप्रकारे सुनील शेट्टीने तब्येतीचे अपडेट्स देऊन चाहत्यांची चिंता दूर केली आहे. त्याच्या दुखापतीबाबतही अशा बातम्या येत आहेत की त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ज्याचे खंडन खुद्द अभिनेत्याने या पोस्टद्वारे केले आहे. आणि चाहत्यांना काळजीपासून मुक्त केले आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18: ‘बिग बॉस 18’ मध्ये अखेर सुरु झाली नवी प्रेमकहाणी; अविनाश मिश्राने ईशा सिंगला केले इम्प्रेस!
सुनील शेट्टी यांची कारकीर्द
हंटर या वेबसिरीजद्वारे सुनील शेट्टीने ओटीटीच्या जगात खळबळ उडवून दिली. आता या मालिकेचा दुसरा सीझनही ॲमेझॉन मिनी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. याशिवाय सुनील शेट्टी ‘वेलकम टू द जंगल’ या मोस्ट अवेटेड कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. ज्याचा प्रोमो आधीच आऊट झाला होता. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार होता, परंतु तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस हा चित्रपट देखील येणार आहे.