अनिल कपूर हे एक हिंदी चित्रपटसृष्टील नावाजलेले अभिनेता आहे. त्यांच्या भूमिका आणि काम चाहत्यांना प्रचंड आवडते, तसेच त्यांची एनर्जीलेव्हलचा सामना कोणीही करूच शकत नाही. विविध भूमिका साकारण्यापासून, बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडण्यापासून ते पॅथब्रेकिंग चित्रपटांची निर्मिती करण्यापर्यंत अभिनेते अनिल कपूरने कायम चर्चेत आहेत. एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अनिल कपूरने कायम दर्जेदार काम केले आहेत. अश्यातच आता या स्टारने शाळेतील खास क्षण अनुभवताना दिसले आहेत.
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरने अलीकडेच त्याच्या बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देण्याचा आनंद अनुभवला आहे. या मेगास्टारने आपल्या मॉर्निंग वॉकमधून ब्रेक घेऊन शाळेतील मुलांसोबत आनंदी क्षण शेअर केला आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शाळकरी मुला सोबत एक फोटो शेअर केले ज्यात लिहिले आहे की, “शाळेत पुन्हा याव आणि लहान होऊन जावं ” आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा सिनेमाचा आयकॉन त्यांच्यासोबत मजेदार संवाद साधताना दिसला. सगळी मुले या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहेत. याच बरोबर स्टार अनिल कपूरच्या चेहऱ्यावर देखील हास्य खुलून आले आहे.
शाळेतील मुलांना भेटण्यासाठी अनिल कपूर मॉर्निंग वॉकच्या वेळेस गेले होते त्यामुळे या शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनिल कपूर जॉगिंग आउटफिटमध्ये दिसत होते. तसेच या फोटोच्या आजूबाजूला शाळेतील मुलं उभी असून, त्याच्या सोबत शालेय सेविकदेखील उभ्या आहेत.
अनिल कपूर आता येणाऱ्या आघाडी चित्रपट ‘सुभेदार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तसेच अलीकडे त्याने सोशल मीडियावर त्याच्या या चित्रपटाच्या शूटिंगची एक झलक शेअर केली होती. हॉलिवूडचे निर्माते रोरी मिलिकिन यांनी यासाठी त्यांचे खास कौतुक केले होते. तसेच, जेरेमी रेनरने देखील या शेअर केलेल्या फोटोला लाईक केले.
‘बिग बॉस ओटीटी 3’ होस्ट म्हणून पदार्पण केलेल्या अनिल कपूरने शोमध्ये वेगळीच जादू निर्माण केली आहे. त्याचा फिटनेस आणि स्टाइल अनेकदा त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शो होस्ट करण्याव्यतिरिक्त अनिल कपूर ‘सुभेदार’ मध्ये निर्दोष परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे, जो त्याचा दिग्दर्शक सुरेश त्रिवेणीसोबतचा पहिला प्रोजेक्ट आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचे देखील चर्चा होत आहे.