फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 मध्ये सध्या प्रेक्षकांना भरपूर ड्रामा पाहायला मिळत आहे. सलमान खानच्या शोचे काय होणार हे कोणालाच माहीत नाही. शो जिंकण्यासाठी स्पर्धक जोरदार प्रयत्न करताना दिसतात. शो जसजसा फिनालेकडे सरकत आहे, तसतसे घरातील सदस्यांचे खरे चेहरे समोर येत आहेत. नुकतेच वाईल्ड कार्ड स्पर्धक दिग्विजय सिंह राठी याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर सलमान खानने त्याला विकेंडच्या वॉरला स्टेजवर बोलावले होते. यामध्ये त्याने घरातल्या सदस्यांना आणि दिग्विजय राठीला प्रश्न केले होते. दिग्विजयनंतर आता यामिनी मल्होत्रा आणि इडन रोजही बाहेर असल्याची बातमी आहे.
दिग्विजयच्या हकालपट्टीमुळे करण वीर मेहरा आणि चाहत पांडे खूपच उदास दिसत होते. करणने तिला बाहेर काढण्यासाठी स्वतःला जबाबदार मानले आणि चुम दारंगला दोषी म्हंटले आहे. त्याआधी कालच्या भागामध्ये एक घटना झाली त्यामुळे चाहते सध्या सोशल मीडियावर करणवीर मेहराची वाहवाह करत आहेत. ‘बिग बॉस 18’ च्या शेवटच्या एपिसोडमध्ये, करण वीर मेहरा दिग्विजयच्या घरातून बाहेर पडल्यामुळे खूप दुःखी दिसत होता. यावेळी तो त्याच्या बेडवर झोपलेला होता आणि त्यावेळी चुम दारंग श्रुतिका अर्जुनकडे जाते आणि तिला विकेंडच्या वॉरसाठी नवीन ड्रेस घालायला सांगते.
Bigg Boss 18 : सलमानसमोर अविनाशवर चिडली शिल्पा, म्हणाली – त्याला गप्प बसायला सांग
त्यानंतर चुम दारंग करणकडे येते, यावेळी करण तिला म्हणतो की, मग काल दिग्विजय गेला तेव्हा रडण्याची काय गरज होती. तो बाहेरून सुद्धा बघत असेलच ना. यावेळी शिल्पा त्याला म्हणते की, ती (श्रुतीका) एकटी आहे मला सांगू नका. यावेळी चुम दारंग सुद्धा करणवीरला पुन्हा सांगते की ती एकटी आहे. यावर करण आणखी भडकतो आणि तिच्यावर संतापतो. यावेळी तो म्हणतो की, चुम मी तुला कालच सांगितलं होत की तुला कोणाला तरी एकट्याला निवडायला लागणार आहे. आता ती माझी क्षमता संपली आहे तू तुझ्या मैत्रिणीकडेच जा, तिला गरज आहे तिची. तिने काल खूप चांगलं काम केलं आहे तिला तुझी गरज आहे. तू तिला जाऊन तिचे ड्रेस आणि तिचा मेकअप निवडण्यात मदत कर जा तिला तुझी गरज आहे. उद्या मला काढलं तर तिला कपडे निवडण्यात मदत कर.
This monologue 🔥🔥👏👏
In yesterday’s episode #KaranveerMehra was on fire 🔥🔥💪💪
He even called out #ChumaDarang and it was needed you can’t be all goody goody who made your friend #DigvijayRathee got evicted #BiggBoss18 #BiggBoss
— BB Memer (@bb_memer) December 22, 2024
चुम दारंग पुन्हा त्याला सांगते की सध्या ती एकटी आहे ना? यावर पुन्हा करण संतापून म्हणतो की, चुम तू सुद्धा खूप स्वार्थी आहेस तेवढीच. यावर शिल्पा बोलते तू गप बसणार आहेस का? यावर करण म्हणतो की, मी अजिबात शांत बसणार नाही मला जे वाटेल ते मी आता तोंडावर बोलणार आहे. मी खेळलो नाही तो खेळ कारण मला चुमला बनवायचं होत, दिग्विजय तो खेळ खेळाला नाही कारण त्याला चुम बनवायचं होत आणि त्या बाईने काय केलं त्याच्यासोबत आणि तुम्ही तिला खायला घालत आहेत. तुम्ही त्या मुलाच्या आयुष्यासोबत खेळत आहात. २५ वर्षाचा आहे तो या वयात इथे आला आहे. आणि तो आता जर इथे असता तर टॉप ५ मध्ये असता बिग बॉसने स्वतः सांगितलं.
पुढे करण म्हणाला की, बिग बॉसने पुन्हा पुन्हा विचारले की तू बरोबर केलं आहेस का? तुम्हाला रँकिंग बदलायचे आहे का, असा सवालही त्यांनी केला. नाही. पण ठीक आहे, ड्रेस महत्वाचा आहे, मेकअप महत्वाचा आहे.
करण वीर मेहराच्या या विधानाने चुम दरंग खूपच दु:खी दिसला. करण वीरचे म्हणणे ऐकून चुमने त्याची माफी मागितली आणि तेथून निघून गेली. करणच्या या बोलण्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. चुम, करण आणि दिग्विजय यांच्यातील मैत्री घरात खूप घट्ट मानली जात होती.