Aliya Basu Gayab Hai
‘आलिया बसू गायब है’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. प्रीती सिंग दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरची एक रोमांचकारी रचना करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना रहस्यमयी आणि चित्रपटाच्या मुख्य पात्रांची ओळख करून देणाऱ्या थरारक नाटकाची माहिती मिळते आहे. या चित्रपटाचा ट्रेलरच पाहून प्रेक्षकांच्या मनात हि कथा पाहण्याची उत्कंठा वाढली आहे.
रिहॅब पिक्चर्सचा ‘आलिया बसू गयाब है’ प्रीती सिंग दिग्दर्शित आणि विनय पाठक, रायमा सेन आणि सलीम दिवाण अभिनीत चित्रपट त्याच्या पहिल्या पोस्टर आणि मनोरंजक ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा करत आहे. आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि यामध्येच भर घालत निर्मात्यांनी बहुप्रतिक्षित चित्रपटातून ‘ओये सुन बा’ गाणं रिलीज केला आहे.
नेहा करोडे यांनी गायलेल्या या गाण्याने चित्रपटाच्या संगीत प्रवासाची सुरुवात होते, या गाण्याचे बोल डॉ. सागर यांनी लिहिले आहेत आणि संगीत मन्नान मुंजाल यांनी दिले आहे. गाण्यातील रॅप आणि व्होकल्स आकर्षक आहेत आणि व्हिज्युअल प्रेक्षकांना चित्रपटाच्या रोमांचक जगात घेऊन जाणारे आहेत.या चित्रपटाचे निर्माते डॉ. सत्तार दिवाण यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे ते म्हणाले की, “चित्रपटाच्या निर्मितीमागील उद्देश भारतीय चित्रपटात थ्रिलर संस्कृती परत आणणे आहे.” मनोरंजनाचे आवाहन आणि योग्य आशय असलेल्या थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि आम्ही एक असा चित्रपट तयार केला आहे जो प्रेक्षकांना धक्कादायक वळणांनी भरलेल्या नवीन जगात घेऊन जाईल.” असे त्यांनी सांगितले.
आलिया बसू गायब है 9 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे एका रोमांचक सिनेमॅटिक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एक आकर्षक कथा, विनय पाठक, रायमा सेन आणि सलीम दिवाण यांच्या उत्कृष्ट अभिनयासह आणि प्रीती सिंगच्या डायनॅमिक दिग्दर्शनासह, हा चित्रपट भारतीय थ्रिलरला पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे त्यामुळेच चाहत्यांना हा चित्रपट पाहायची आतुरता लागली आहे.