Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री अस्मिता देशमुख शेअर केला खास अनुभव!

मराठी वाहिनी 'सन मराठी'वरील 'तुझी माझी जमली जोडी' ही मालिका चर्चेत आहे. तसेच या मालिकेमधील अभिनेत्री अस्मिता देशमुखने तिच्या फिटनेस बद्दल खास अनुभव शेअर केले आहे. २१ जून रोजी योग दिनानिमित्त तिने हा अनुभव शेअर केला.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 20, 2025 | 04:10 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘सन मराठी’वरील प्रत्येक मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाही, तर प्रेक्षकांना प्रत्येक मालिकेतून महिला सशक्तीकरणाचा संदेशही मिळत असतो. या वाहिनीवरील सर्वच मालिकांमध्ये  जशी मुख्य अभिनेत्री आत्मविश्वासू आणि ठाम दिसते, तशीच ती खऱ्या आयुष्यातही सशक्त स्त्री आहे. ‘तुझी माझी जमली जोडी’ मालिकेतील सई म्हणजे अभिनेत्री अस्मिता देशमुख फिटनेसप्रेमी आहे आणि योगा हा तिच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने अस्मिताने तिचा वैयक्तिक योग अनुभव शेअर केला आहे.

Vivek Lagoo : ज्येष्ठ अभिनेते आणि रिमा लागू यांचे पती विवेक लागू यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

२१ जून रोजी सर्वत्र योगा दिन साजरा करण्यात येणार आहे. चित्रपट आणि मालिकेसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्याला फिटनेसबाबत सल्ला देताना दिसत असतात. तसेच त्या नेहमीच आपल्या अभिनयाबरोबर तंदुरुस्त शरीराकडेही लक्ष देत असतात. योगा दिन साजरा होत आता ‘सन मराठी’वरील ‘तुझी माझी जमली जोडी’ मालिकेतील सई म्हणजे अभिनेत्री अस्मिता देशमुखने चाहत्यांना तिचा योगाबद्दलचा खास अनुभव सांगितला आहे.

अस्मिता म्हणाली की, “इयत्ता तिसरीपासून मी योगा करण्यास सुरुवात केली. कलाकार म्हणून मला याचा खूप फायदा झाला आहे. रोजच्या शूटिंगसाठी भरपूर ऊर्जा लागते आणि योगामुळे ती ऊर्जा टिकून राहते. दिवसभर काम करूनसुद्धा मी थकत नाही. योगामुळे अनेक आजार दूर राहतात, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश नक्कीच करायला हवा. एक अभिनेत्री म्हणून माझ्या दिसण्यानं आणि व्यक्तिमत्त्वानं प्रेक्षकांवर सकारात्मक प्रभाव पडायला हवा. माझं काम पाहून किंवा माझ्याकडे पाहून प्रेक्षकांना उत्साह आणि ताजेपणाचा अनुभव यायला हवा. योगा माझ्यासाठी केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक संतुलनासाठीही खूप महत्त्वाचा आहे.”

“एका वयानंतर फिजिकल…” रोमान्सबद्दल काय बोलून गेली ६६ वर्षीय नीना गुप्ता; फुटणार का नवा वाद?

याचसह ‘आदिशक्ती’ मालिकेतील शक्ती म्हणजे अभिनेत्री राजसी चिटणीसने योग दिनाच्या शुभेच्छा देत तिने तिचा अनुभव शेअर केला आहे. राजसी म्हणाली की,  “गेल्या काही महिन्यांपासून योगा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसाला १२-१३ तास चालणारं मालिकेचं चित्रीकरण, त्यात स्वतःसाठी वेळ काढणं हे खरंच एक मोठं आव्हान असते. पण कितीही धावपळ असली, तरी मी दररोज एक तास योगासाठी काढते. योगामुळे केवळ शरीर नाही, तर मनही शांत राहतं. माझ्या त्वचेमध्ये नैसर्गिक उजळपणा आला आहे, पचनक्रिया सुधारली आहे. अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं खूप गरजेचं आहे. योगाने मला ही ऊर्जा दिली आहे, म्हणूनच मी योगा कायम सुरू ठेवणार आहे.” असे अभिनेत्री म्हणाली आहे.

Web Title: Devmanus fame actress asmita deshmukh shared a special experience on the occasion of international yoga day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • entertainment
  • international yoga day
  • Marathi News

संबंधित बातम्या

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख
1

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
2

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
3

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
4

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.