ज्येष्ठ अभिनेते आणि रिमा लागू यांचे पती विवेक लागू यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या शांत पण प्रभावी अभिनयाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विवेक लागू यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. २० जून रोजी सकाळी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती पत्रकार विक्की लालवानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली.
एक गाडी आणि उलगडणार अनेक रहस्ये; ‘गाडी नंबर १७६०’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!
विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती होते. दोघांची भेट १९७६ साली एका बँकेत काम करत असताना झाली होती. रंगभूमी आणि अभिनयाची समान आवड यामुळे त्यांच्यात जवळीक वाढली. हे नातं पुढे प्रेमात आणि मग १९७८ मध्ये विवाहात परावर्तित झाले. मात्र, काही वर्षांनी वैयक्तिक मतभेदांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांनी एकमेकांबद्दलचा आदर आणि सलोखा कायम ठेवला. रीमा लागू यांच्या २०१७ मध्ये झालेल्या अकाली निधनापर्यंत ही स्नेहसंबंध टिकून होते.
या दांपत्याची मुलगी मृण्मयी लागू वैकुळ या चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या लेखिका आणि दिग्दर्शिका आहेत. ‘थप्पड’ आणि ‘स्कूप’ यांसारख्या समीक्षात्मक दृष्टिकोनातून गाजलेल्या प्रकल्पांची ती लेखिका असून तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
गाडी नंबर 1760 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर
विवेक लागू यांनी रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या शांत स्वभावातून प्रभावी भूमिका साकारल्या. त्यांनी केवळ कलाकार म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील माणूस म्हणूनही आपल्या नात्यांचे जतन केले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
विवेक लागू यांचं निधन नेमकं कशामुळे झालं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या पत्नी रिमा लागू यांचं लग्नाआधीचं नाव नयन बडबडे असं होतं. रिमा लागू यांनी अभिनय करता करता बँकेत नोकरी केली. त्यावेळी कलाकारांसाठी खास कोटा होता. बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान त्यांची आणि विवेक यांची भेट झाली होती. विवेक लागू तेव्हा २३ वर्षांचे होते तर रिमा लागू यांचं वय १८ होतं. त्यानंतर ते दोन वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. १९७८ साली ते लग्नबंधनात अडकले. मात्र काही वर्षांनी त्यांच्या नात्यात कटूता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले. यातून त्यांचा घटस्फोट देखील झाला. घटस्फोटानंतरही रिमा लागू हेच नाव लावलं होत्या