• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Uttar What Abhinay Berde And Renuka Shahane Said About The Heartfelt Motherson Story

आई-लेकामधील हळुवार नात्याची गोष्ट ‘उत्तर’, सिनेमातील खास गोष्टी बद्दल अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

सिनेमागृहात रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा " उत्तर " हा चित्रपट लवकरच झी 5 मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Feb 12, 2026 | 06:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उत्तर हा सिनेमा एक हळुवार आणि भावना आधारित आई‑मुलाचा नात्याचा प्रवास दर्शवणारी कथा आहे, ज्यात तंत्रज्ञान (AI) आणि मानवी नात्यांचा संगम प्रेक्षकांना भावतो. या चित्रपटात अभिनयची भूमिका ही लक्षवेधी ठरली. चित्रपटातील निनाद या पात्राबद्दल अभिनेते अभिनय बेर्डे म्हणाला, “मला वाटतं लेखक-दिग्दर्शकांनी या पात्राचा प्रवास आणि त्याची मानसिकता अतिशय वास्तववादी पद्धतीने रचली आहे. जेन Z पिढी आता पुढे येत आहे, ती कामाच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे आणि अर्थव्यवस्थेतील मोठा घटक बनत आहे. त्यामुळे त्या पिढीसमोर असलेले सगळे प्रश्न, त्यांचे फायदे आणि तोटे हे सगळं पटकथेत आणि चित्रपटात असणं गरजेचं होतं. या प्रक्रियेत मला देखील त्या पिढीबद्दलचं माझं आकलन पुन्हा शोधावं लागलं. जेव्हा मी पहिल्यांदा कथा ऐकली, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की मी ‘उत्तर’सारखा चित्रपट करेन. मला वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट करायची इच्छा होती, पण असा विषय कधीच माझ्या कल्पनेत नव्हता. हा माझ्यासाठी पूर्णपणे नवा दृष्टिकोन होता आणि त्यामुळेच हा अनुभव अधिक आनंददायी ठरला. हा नवा दृष्टिकोनच मला या चित्रपटाचा भाग व्हावंसं वाटण्याचं कारण ठरला.

शूटिंग करताना मला जाणवलंच नाही की चित्रपटात इतकी शांतता असेल की फ्रेम्स इतक्या स्थिर राहतील आणि चित्रपटाला ‘श्वास घेण्याची’ जागा दिली जाईल. हे मला फक्त अंतिम कट पाहिल्यावर कळलं. मला माझ्या पात्राची मानसिक अवस्था आणि तो भावनिकदृष्ट्या काय अनुभवतो आहे हे माहीत होतं, त्यामुळे मी फक्त त्या दृष्टिकोनातूनच काम करत होतो. भावनिक ओझं पेलण्यासाठी माझ्या सहकलाकारांनी खूप मदत केली. संयम हा माझ्या स्वभावातच आहे; मी स्वतःच्या आयुष्यातही खूप संयमी आहे. अगदी गरज असेल तेव्हाच मी व्यक्त होतो. पात्राच्या भूतकाळातून आलेलं भावनिक ओझं माझ्याही आयुष्यातील काही अनुभवांसारखंच होतं. माझं बालपण फार सोपं नव्हतं. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि माझं बरंचसं बालपण वसतिगृहात गेलं. काही अनुभव मी खूप काळ मनात साठवून ठेवले होते, आणि तेच अनुभव माझ्या अभिनयाला मदत करतील असं मला कधी वाटलंच नव्हतं. शूटिंगदरम्यान दिग्दर्शक आणि छायाचित्रकार (DOP) यांना शांततेचं महत्त्व माहीत होतं, पण मी फक्त ते अनुभवत होतो.”

भूमि पेडणेकरने 300 कोटींच्या बजेटच्या चित्रपटाला का दिला नकार? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं खरं कारण

आईच्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांचा वेगळा दृष्टीकोन मांडला आहे. या पात्राबद्दल त्या म्हणाल्या, “मला आधीच माहिती होते की हा विषय आणि ज्या प्रकारे तो मांडला गेला आहे, तो अनेक लोकांना भिडेल आणि तसेच झाले. यात फारसे आश्चर्य नव्हते. मात्र प्रेक्षकांनी कथेशी निर्माण केलेली भावनिक नाळ पाहून मी थक्क झाले. लोकांनी तो चित्रपट पुन्हा पुन्हा पाहायला जात होते, हे मला खूप आवडले, अशाच प्रकारच्या प्रेक्षकांची आम्ही स्वप्ने पाहतो. अनेक लोकांना तो थिएटरमध्ये पाहायचा होता पण ते शक्य झाले नाही, आणि आता ZEE5 वर तो दाखवला जात आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे.हा चित्रपट प्रामुख्याने ‘वर्ड ऑफ माऊथ’मुळे पुढे गेला. आम्हाला उत्तम समीक्षणे मिळाली, हे नक्कीच आनंददायी होते, पण खऱ्या अर्थाने लोकांमधील चर्चेमुळेच तो पुढे पोहोचला. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये चित्रपटाबद्दल चर्चा होत होती आणि माझ्या कुटुंबातील काही सदस्यांनी ते मेसेजेस मला पाठवले. लोकांना चित्रपट आणि माझी भूमिका आवडली हे कळून मला खूप आनंद झाला. ते खूप भावनिक आणि भारावून टाकणारे होते” . लवकरच उत्तर झी 5 वर प्रदर्शित होणार असून आई आणि मुलाच्या नात्यातील ही गोष्ट उलगडणार आहे.

मनोज बाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाचे थांबले प्रदर्शन; सर्वोच्च न्यायालयाने शीर्षक बदलण्याचे दिले आदेश

Web Title: Uttar what abhinay berde and renuka shahane said about the heartfelt motherson story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं
1

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

Vijay Deverakonda आणि Rashmika ने शेअर केले संगीत नाईट्सचे फोटो; कपलचा रोमँटिक डान्स व्हायरल, पाहा Inside Photo …
2

Vijay Deverakonda आणि Rashmika ने शेअर केले संगीत नाईट्सचे फोटो; कपलचा रोमँटिक डान्स व्हायरल, पाहा Inside Photo …

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….
3

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा
4

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

Mar 03, 2026 | 09:21 PM
Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Iran Israel War: ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी…’; काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

Mar 03, 2026 | 09:19 PM
NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

Mar 03, 2026 | 09:17 PM
US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

US-Israel Iran War: “इराणला आता चर्चा करायचीय, पण आता…”, युद्धाच्या पार्श्वभूमीवर Donald Trump यांचा स्पष्ट इशारा; म्हणाले….

Mar 03, 2026 | 08:35 PM
Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

Mar 03, 2026 | 08:29 PM
Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

Mar 03, 2026 | 08:21 PM
BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

BSNL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या पात्रता

Mar 03, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.