(फोटो सौजन्य-Instagram)
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री हिना खानसाठी हा काळ खूपच कठीण आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त आहे. जूनच्या अखेरीस, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना तिने सांगितले होते की ती स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि त्यावर उपचार सुरू आहे. अश्यातच अभिनेत्री तिच्या तब्येतीची काळजी घेताना दिसत आहे आणि तसेच ती सतत चाहत्यांनादेखील तिच्या आरोग्याची माहिती देत आहे. या बातमीनंतर हिनाचे चाहते आणि तिचे कुटुंबीय तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. हिना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि तिच्या प्रवासातील प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.
हिना खानचा नवीन व्हिडिओ
हिना खान सध्या तिच्या स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. या काळात तिला वेदनादायक केमोथेरपीचे सत्र घ्यावे लागते. अशा स्थितीत तिचे केसही गळले आहेत. नुकतेच अभिनेत्रीने तिचे केस लहान केले होते परंतु आता यानंतर तिने आपल्या केसांचे मुंडन केले आहे. तिने मंगळवारी तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती तिची स्किन केअर रूटीन शेअर करताना दिसत आहे. तसेच, हा एक ॲड शूट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये हिनाने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली आहे. हिना तिचा नो-मेकअप लुक दाखवताना दिसली आहे.
हे देखील वाचा- अमिताभ बच्चनने राधिका मदनला लिहिले होते पत्र, अभिनेत्रीने केला खुलासा!
चाहते आणि मित्रांनी दिली प्रतिक्रिया
या व्हिडिओवर हिना खानला पाहून तिचे चाहते खूप कमेंट करत आहेत. टीव्ही अभिनेता नकुल मेहता यांनी लिहिले, ‘चॅम्पियन’. अभिनेत्री दृष्टी धामीने एक शौर्य इमोजीची टिप्पणी केली आहे. याशिवाय एका चाहत्याने लिहिले- ‘ती केसांसोबत आणि केसांशिवाय खूप सुंदर दिसते.’ आणखी एका युजरने लिहिले – सर्वात मजबूत महिला. तुमच्यासाठी खूप खूप प्रार्थना. अशा प्रतिक्रिया देऊन चाहत्यांनी तिच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.