(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
2022 मध्ये कांतारा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले तसेच निरीक्षकांनी चित्रपटाचे भरपूर कौतुकही केले. या चित्रपटाने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभूतपूर्व या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. तसेच या चित्रपटामधील अभिनेता ऋषभ शेट्टीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाने भारताच्या मध्यभागी असलेली एक विलक्षण कथा आणि समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची जगाला ओळख करून दिली. हा चित्रपट खूप सुपरहिट झाला. चाहत्यांनी या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले. तसेच या चित्रपटाच्या आगामी प्रीक्वल कांतारा चॅप्टर 1 घोषणेनंतर सगळ्यांनी पुन्हा एकदा या बद्दल उत्सुकता दाखवली आहे. भूत कोला सणाचे प्रदर्शन करणाऱ्या ‘कांतारा’ मध्ये सगळ्यांनी पाहिल्याप्रमाणे कांतारा: चॅप्टर 1 मध्ये कदंब कालावधी समोर आणण्यासाठी आता सज्ज झाले आहे.
कांतारा चॅप्टर 1 हा एक अद्भत प्रकारचा अनुभव असल्याचे वचन देतो. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते आणि त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे.
हे देखील वाचा- अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’मध्ये निम्रत कौरची एन्ट्री, चित्रपट या दिवशी सिनेमागृहात होणार दाखल!
निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले असून अगदी चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला, त्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी 80 फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला परंतु त्यांना योग्य काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधला. आणि चित्रपटाची शूटिंग सुरु केली.
हे देखील वाचा- Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात जबरदस्त हाणामारी, हे दोन स्पर्धक एकमेकांना भिडले!
या व्यापक प्रयत्नामागील कारण म्हणजे कदंब घराण्याचे महत्त्व, ज्याने भव्य दक्षिण भारतीय वास्तुकलेची सुरुवात केली. कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी ओळखला जातो. कांतारा: चॅप्टर 1 या काळात सेट केला आहे. आणि हा चित्रपटात या कथेवर आधारित आहे. प्रीक्वल मधून चित्रपटाच्या विविध बाजू दिसणार आहेत. निर्माते या युगाची पुनर्निर्मिती करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसून ते हा चित्रपट साकारण्यासाठी अनेक आव्हान स्वीकारत आहेत. अत्यंत अपेक्षीत “कांतारा चॅप्टर 1” सह पूर्वी कधीही न झालेल्या दिव्य अनुभवाचा आनंद देण्यसाठी सज्ज आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.