Radhika mandan
राधिका मदान ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे. अक्षय कुमार अभिनीत आणि सुधा कोंगारा दिग्दर्शित तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सरफिरा’ आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटामध्ये राधिकाच्या साकारलेली “राणी” ची भूमिका ही खूप उत्तम आणि लक्षवेधी आहे. राधिका मदनच्या “राणी” सारख्या सशक्त स्त्रीच्या भूमिकेला सर्व प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे कारण तिने तिच्या भूमिकेने समीक्षक आणि प्रेक्षकांना थक्क केले आहे.
अलीकडेच, एका मुलाखतीत, चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा यांनी चित्रपटातील राधिका मदनच्या कास्टिंगचे खूप कौतुक केले आणि त्या म्हणाल्या की, “मला तिचा पटाखामधील अभिनय खूप आवडला. मी अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जी पारंपरिक भूमिकेत वेगळी दिसेल आणि त्या अभिनेत्रींमध्ये राणी भूमिका साकारण्यासाठी निरागसता असेल राधिका मध्ये मला हे सगळ दिसून आल, आणि या पात्रासाठी मला ती परफेक्ट वाटली.” असे त्यांनी सांगितले.
प्रेक्षक नव्या जोडीकडे अधिक आकर्षित होतील असे दिग्दर्शक सुधा कोंगारा याना वाटले आणि अक्षय कुमार आणि राधिका मदन यांची जोडी एकदम फिट दिसत होती. त्यामुळे या दोघांचीही या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
राधिका मदनसाठी सुधा कोंगारा यांनी केलेले कौतुकातून हे स्पष्ट होते, की ती या व्यक्तिरेखेसाठी योग्य होती. राधिका मदनचे राणीचे चित्रपटगृहात प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे. अभिनेत्रीचा पोशाख, दागिने हे सगळे पाहून पप्रेक्षकांना तिचे पात्र खूप आवडले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमारसह राधिका मदन देखील मुख्यभूमीक साकारत आहे. या दोघांची केमेस्ट्री या चित्रपटामधून पाहण्यासारखी आहे.
‘अंग्रेजी मीडियम’, ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘शिद्दत’ आणि ‘कुट्टे’ यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखली जाणारी राधिका मदन ही आता तिच्या अजून नवनवीन प्रोजेक्ट्स साठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुधांशू सारिया दिग्दर्शित ‘सना’ या चित्रपटातदेखील ती काम करताना दिसणार आहे. आणि प्रशांत भागिया दिग्दर्शित ‘रुमी की शराफत’मध्येही प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.