(फोटो सौजन्य- Social Media)
अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ही सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक आहे. निर्माते लवकरच हाऊसफुल चित्रपटाचा पाचवा भाग आणण्याच्या तयारीत आहेत आणि त्याची घोषणाही करण्यात आली आहे. यावेळी या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसोबत फरदीन खान देखील दिसणार आहे. परंतु महिला आघाडीबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, आता याबाबत एक अपडेट समोर आले आहे. या चित्रपटामध्ये आता बॉलीवूड अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी एका बॉलीवूड अभिनेत्रीची कास्टिंग फायनल केली आहे. बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब असलेल्या जॅकलिन फर्नांडिसला ही संधी मिळाली आहे. बॉलिवूड हंगामाने दावा केला आहे की ती अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल 5’ मध्ये दिसणार आहे.
या अभिनेत्रीची होणार एन्ट्री
बॉलीवूड हंगामाने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की जॅकलीन हाऊसफुल 5 मध्ये अक्षय कुमारसोबत दिसण्याची शक्यता आहे. पोर्टलने म्हटले आहे की, “जॅकलीन हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये परतण्यास उत्सुक आहे. तिला कॉमिक स्पेस आवडते आणि साजिद नाडियाडवाला आणि हाऊसफुल फ्रँचायझीशी स्वतःला जोडण्यात तिला आनंद मिळतो. साजिद सध्या चित्रपटात दिसण्यासाठी आणखी तीन प्रमुख अभिनेत्रींच्या शोधात आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.” असे त्यांनी सांगितले.
कधी होणार चित्रपट रिलीज
साजिदने गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती. याआधी हा चित्रपट दिवाळी 2024 च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता पण नंतर तो पुढे ढकलण्यात आला. रिलीजच्या तारखेबाबत एक निवेदन जारी करताना साजिद नाडियादवाला म्हणाले होते, ‘हाऊसफुल फ्रँचायझीला आतापर्यंत प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि आम्हाला आशा आहे की हाउसफुल 5 ला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळेल.’ असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- अक्षय कुमारसह “हाऊसफुल ५”मध्ये झळकणार हे कलाकार, २०२५ ला होणार प्रदर्शित!
तसेच हा चित्रपट आता पुढच्यावर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्याने पुढे लिहिले, ‘टीमने एक उत्कृष्ट कथा तयार केली आहे ज्यासाठी भरपूर VFX आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून तुम्हाला मनोरंजनाचा पाचपट जास्त डोस देता येईल. ‘हाऊसफुल 5’ आता 6 जून 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.