( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन आज ३६ वर्षांची झाली. ती तिचा हा वाढदिवस तिच्या जवळच्या मित्रांसोबत आणि प्रियकर अली गोनीसोबत मोठ्या थाटामाटात साजरा करणार होती. पण कदाचित नियतीने तिच्यासाठी काही वेगळेच ठरवले होते. अली गोनीने दिलेल्या माहितीनुसार, जस्मिनला तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अली गोनी त्याची गर्लफ्रेंड जस्मिन भसीनला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला घेऊन आला होता. मात्र, जस्मिनची तब्येत अचानक खालावली. तिची प्रकृती इतकी बिघडली की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. जी सुट्टीची सहल म्हणून सुरू झाली होती, तिचे रूपांतर लवकरच रुग्णालयातील वास्तव्यात झाले. या अभिनेत्याने जस्मिन भसीनशी संबंधित सर्व माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.
अलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत जस्मिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या प्रकृतीबद्दल दुःख व्यक्त केले. अभिनेत्याने आपल्या प्रेयसीच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. त्याने जस्मिनला लिहिले, “आपण तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलो होतो, पण नशिबाने वेगळाच डाव साधला. वाढदिवसाच्या सुंदर आठवणी बनवण्याऐवजी, आज आपण हॉस्पिटलच्या खोलीत आहोत.”
तुला या अवस्थेत पाहणे हा या संपूर्ण प्रवासातील सर्वात कठीण क्षण आहे. तुला पुन्हा निरोगी आणि हसताना पाहण्यासाठी मी कोणताही उत्सव सोडून देईन. अल्लाह तुला सदैव आनंद, उत्तम आरोग्य, भरपूर प्रेम आणि यश देवो. लवकर बरा हो, आज माझ्या हृदयातून हीच एक वाढदिवसाची इच्छा आहे.
अली गोनीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत जस्मिनच्या प्रकृतीमागील कारण स्पष्ट केले आहे. त्याने सांगितले की, अभिनेत्रीला गंभीर संसर्ग झाला असून तिची प्रकृती खूपच खालावली आहे. अलीने लिहिले, “जे सर्वजण मला सतत फोन आणि मेसेज करत आहेत, त्या सर्वांसाठी हा एक संदेश. तुमच्या प्रेमाबद्दल, प्रार्थनांबद्दल आणि सदिच्छांबद्दल मनापासून धन्यवाद.”
आम्ही जास्मिनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला आलो होतो, पण तिची तब्येत अचानक खालावली आणि एका गंभीर संसर्गामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. गेले काही दिवस आमच्यासाठी खूप कठीण आणि भावनिक होते. मी तुमच्या संदेशांना उत्तर देऊ शकलो नसेन किंवा तुमचे फोन घेऊ शकलो नसेन, त्याबद्दल मी दिलगीर आहे. सध्या माझे संपूर्ण लक्ष तिच्यासोबत असण्यावर आहे. तिच्यावर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा. इंशाअल्लाह, ती लवकरच हसतमुखाने तुम्हा सर्वांमध्ये परत येईल.
जास्मिन आणि अली बऱ्याच काळापासून नात्यात आहेत. त्यांची भेट ‘बिग बॉस १४’ या रिॲलिटी शो दरम्यान झाली आणि तिथेच त्यांचे प्रेम फुलले. सध्या ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत आणि चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.






