(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
सुधीर बाबू- आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या जटाधारा या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जटाधारा या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. याआधी चित्रपटाच्या धमाकेदार टीजरला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. निर्मात्यांनी एका जबरदस्त मोशन पोस्टर सोबत रिलीज डेटची घोषणा केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जयस्वाल आणि वेंकट कल्याण यांनी केले आहे. या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हा टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात दिव्या खोसला, शिल्पा शिरोडकर, इंदिरा कृष्णा, रवी प्रकाश, नवीन नेनी, रोहित पाठक, झांसी, राजीव कनकला आणि शुभलेखा सुधाकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘देखा क्या?’ ला कान्स 2025 मध्ये दुहेरी यश; सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट आणि दिग्दर्शन पुरस्कार
‘जटाधारा’ चित्रपटाची थोडक्यात माहिती
जटाधारा हा एक पौराणिक नाट्यचित्रपट आहे. ज्यात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात धनापीशाचीनी या दैत्यनारीची भूमिका साकारत आहे, जी लोभाचे प्रतिक आहे. या चित्रपटात सुधीर बाबू मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट प्राचीन पौराणिक कथांवर आधारित आहे.
कधी रिलीज होणार ‘जटाधारा’?
७ नोव्हेंबर २०२५ रोजी जटाधारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी एका जबरदस्त मोशन पोस्टर सोबत रिलीज डेटची घोषणा केली आहे.
कतरिना आणि विकी लवकरच आई बाबा होणार? ‘या’ महिन्यात करणार बाळाचे स्वागत
कोण आहे सुधीर बाबू?
पोसानी नागा सुधीर बाबू हा एक भारतीय अभिनेता आणि माजी बॅडमिंटन खेळाडू आहे. त्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुधीर बाबू याच्या करिअरची सुरुवात ‘शिवा मनसुलो श्रुती’ या चित्रपटातून झाली होती, या चित्रपटात त्यांने मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये विशेषतः चित्रम, बागी , आणि सम्मोहनम यांचा समावेश आहे.