दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा ७ धावांनी उडवला धुव्वा(फोटो-सोशल मीडिया)
Delhi Capitals have reached the final : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह, दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली. एलिमिनेटरमध्ये, गुजरात जायंट्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावून १६८ धावा उभ्या केल्या. एलिमिनेटरमध्ये गुजरातकडून बेथ मूनीने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने लिझेल आणि शफालीसह दमदार सुरुवात दिली. त्यानंतर जेमिमाने कर्णधारपदाला साजेसा असा डाव खेळला. दिल्लीने २६ चेंडू शिल्लक असतानाच सामना खिशात घातला. दिल्लीने १५.४ षटकांत ३ विकेट्स गमावून १६९ धावा पूर्ण केल्या आणि अंतिम संन्याचे टिकीट पक्के केले.
प्रत्युत्तरादाखल, शफाली वर्मा आणि लिझेल ली या दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूत ८९ धावांची सलामी रचली. लिझेलने २४ चेंडूत ४३ धावा आणि शेफालीने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्ज २३ चेंडूत ४१ धावा करून माघारी गेली. लॉरा वोल्फार्ट २४ चेंडूत ३२ धावा करून नाबाद तर कॅप ३ धावा करून नाबाद राहून दिल्लीचा विजय निश्चित केला. गुजरातकडून वेअरहॅमने दोन बळी टिपले. राजेश्वरी गायकवाडने एक विकेट घेतली.
And then there were 2⃣ 🙌 Cannot wait for the 2026 #TATAWPL Final @RCBTweets 🆚 @DelhiCapitals ❤️💙#ClaimTheCrown | #RCBvDC | #Final pic.twitter.com/LpsHd585Xh — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 3, 2026
तथापि, गुजरात जायंट्सला दुसऱ्या षटकातच सोफीच्या (६ धावा) रूपात पहिला धक्का बसला. अनुष्का शर्माने १३ चेंडूत १६ धावा केल्या. कर्णधार अॅशले गार्डनरला भोपळा देखील फोडता आला नाही. कनिका आहुजाने ६ धावा केल्या, वेअरहॅमने २५ चेंडूत ३५ धावा केल्या. जायंट्सकडून सलामीवीर बेथ मुनीने ५१ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. तर जॉर्जिया वेअरहॅमने २५ चेंडूत ३५ धावा केल्या आणि काशवी गौतमने १० चेंडूत १८ धावांची जलद खेळी साकारली. कॅपिटल्सकडून शेनेल हेन्रीने तीन विकेट्स तर नंदिनी शर्माने दोन विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये आरसीबीसोबत दोन हात करणार आहे.
हेही वाचा : WPL मध्ये खेळणार CSK ची टीम? महिला क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याबाबत CEO कासी विश्वनाथन यांनी केला मोठा खुलासा
गुजरात जायंट्स महिला प्लेइंग इलेव्हन: बेथ मुनी (डब्ल्यू), सोफी डेव्हाईन, अनुष्का शर्मा, ॲशले गार्डनर (क), जॉर्जिया वेरेहम, भारती फुलमाली, कनिका आहुजा, काशवी गौतम, तनुजा कंवर, रेणुका सिंग ठाकूर, राजेश्वरी गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: लिझेल ली (डब्ल्यू), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (सी), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा






