विनाशाच्या राखेतून झाला पृथ्वीचा जन्म...; विज्ञानाच्या 'या' शोधाने शास्त्रज्ञही चक्रावले, नेमकं काय घडलं? (फोटो सौजन्य: iStock)
आपल्या पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहे ज्यांचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. अगदी आपल्या पृथ्वाचा जन्म कसा झाला याचे कोडेही आतापर्यंत सुटलेले नाही. काही तज्ज्ञांच्या मते, पृथ्वीचा जन्म हा अब्जावधी वर्षांपूर्वी अवकाशातील धूळ आणि वायूच्या एकत्र येण्याने झाला, तर काहींच्या मते महाभयंकर स्फोटातून ग्रहांची रचना झाली अन् त्यातच पृथ्वी या ग्रहाचा जन्म झाला. परंतु अद्यापही पृथ्वीवरील जीवनाच्या उगमाचे रहस्य हे अंधारातच आहे.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी एक प्रचंड मोठ्या आकाराचा लघुग्रहाने पृथ्वीवर विनाश घडवून आणला होता. यामुळे ७५% पृथ्वीवरील सजीव जीवन नष्ट झाले होते. मेक्सिकोच्या युकातान द्वीकल्पाजवळ चिक्सलुब नावाचा ग्रह कोसळला होता. या लघुग्रहाने डायनासोरसचे जीवन नष्ट केले होते. यानंतर समुद्राच्या तळाखाली जीवसृष्टी वाढू लागल्या आणि हळूहळू पृथ्वीचा उगम होऊ लागल्याचा समज शास्त्रज्ञांना होता. मात्र आता नव्या संशोधनाने शास्त्रज्ञांचे डोळेच विस्फारले आहेत.
२१ जानेवारी २०२६ रोजी Geology या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालीकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, लघुग्रहाच्या धडकेनंतर अवघ्या काही वर्षांमध्ये सूक्ष्म जीवसृष्टींचा उगम होऊ लागला होता. या नियतकालीकानुसार, २००० ते ६,४०० वर्षानंतर जीवसृष्टी उदयास आली होती. पृथ्वीवरील काही भागांमध्ये हा वेग २००० वर्षांपेक्षाही कमी होता. अहवालात आढळून आले आहे की, लघुग्रहाच्या धडकेनंतर हवेत धूल आणि राख पसरली होती, ज्यामुळे पृथ्वीवर १० वर्षे सूर्यप्रकाश पोहोचला नव्हता. यामुळे सजीवसृष्टी निर्माण होण्यासाठी, अन्नासाखळीच्या निर्मितीसाठी वातावरण अनुकूल नव्हते. परंतु अशा परिस्थितीतही पृथ्वीने स्वत:च उभरण्यास सुरुवात केली.
यापूर्वी संशोधख समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील मातीचा अभ्यास करुन पृथ्वीचा कळा मोजायचे. परंतु प्रत्येक ठिकाणचा गाळ वेगवेगळा असल्याने नेमका कालावधी ठरवणे कठीण होते. परंतु संशोधकांनी हेलियम-३ या आयसोटोपचा वापर केला आणि त्यांच्या लक्षात आले की हाच आयसोटोप पृथ्वीवर सतत एकसारखा वेगाने फिरत असतो. याच्या मदतीने निश्चित झाले की, लघुग्रहाच्या धडकेनंतर २००० ते ६,४०० वर्षातच आपली पृथ्वी उदयास आली. टेक्सास युनिव्हर्सिटीच्या मते, पृथ्वीच्या निर्मितीचा वेग थक्क करणारा आहे. या संशोधानातून स्पष्ट होते की, पृथ्वीचा विनाश जरी झाला तर काही वर्षांमध्ये ती पुन्हा जन्म घेईल.






