लोकांना भारतातील प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉस इतका आवडतो की तो हिंदीमध्ये तसेच इतर अनेक भाषांमध्ये प्रसारित केला जातो. आतापर्यंत हिंदी भाषेतील या शोचे 17 सीझन टीव्हीवर आणि 3 सीझन ओटीटीवर आले आहेत. या सगळ्या सीझनला चाहत्यांनी चांगलेच प्रेम दिले आहेत आणि प्रतिसाददेखील मिळाला आहे. हा शो तमिळ भाषेत खूप प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी सातवा हंगाम आला आणि आता नवीन हंगाम येणार आहे. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन हा शो होस्ट करत आहे, पण आता बातमी आहे की तो बिग बॉस 8 चा भाग होणार नाही. याचे कारण अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून सांगितले आहे.
कमल बिग बॉस का होस्ट करणार नाही?
मंगळवारी अभिनेता कमल हसनने त्याच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे की यावेळी तो बिग बॉस सीझन 8 चा भाग होणार नाही. अभिनेत्याने म्हटले आहे की विजय टीव्हीसह होस्ट म्हणून त्याच्या वचनबद्धतेपासून तो काही काळ विश्रांती घेणार आहे. अभिनेत्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रिय दर्शकांनो, जड अंतःकरणाने, मी तुम्हाला कळवू इच्छितो की मी 7 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या माझ्या प्रवासातून एक छोटासा ब्रेक घेत आहे. पूर्वीच्या सिनेमॅटिक वचनबद्धतेमुळे, मी बिग बॉस तमिळचा आगामी सीझन होस्ट करू शकत नाही. तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. तुम्ही मला तुमचे प्रेम आणि आपुलकी दिली आहे, त्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. माझ्यासोबत घालवलेल्या वेळेबद्दल मी तुम्हा सर्वांचे आणि कार्यक्रमातील सहभागींचे मनापासून आभार मानतो.” असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हे देखील वाचा- ‘देवरा’ गाण्यात जान्हवी कपूरचा ज्युनियर एनटीआरसह रोमान्स पाहून ‘बॉयफ्रेंड’ शिखरने दिली प्रतिक्रिया!
इंडियन 2 आणि कल्की 2898 मध्ये दिसला अभिनेता
अभिनेत्याच्या कारकिर्दीवर बोलायचे झाले तर, तो शेवटचा चित्रपट ‘इंडियन 2’ मध्ये रकुल प्रीत सिंग सोबत काम करताना दिसले आहेत. यानंतर अभिनेता दीपिका, प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो निर्माता मणिरत्नमसोबत ठग लाइफ या तमिळ चित्रपटात दिसणार आहे.