विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
Virat Kohli will break Sachin Tendulkar’s record : भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. ११ जानेवारीपासून या मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेपासूनच भारतीय संघ २०२६ मध्ये आपल्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. दरम्यान, या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर खास नजरा असणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराटने आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता न्यूझीलंडविरुद्ध देखील त्याच्याकडून अशाच फॉर्मची अपेक्षा असणार आहे. दरम्यान, या मालिकेत विराट कोहलीला अनेक विक्रम रचण्याची संधी असून त्याच्यामुळे सचिन तेंडुलकरचा विक्रय देखील धोक्यात आला आहे.
भारताचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीला वर्षाच्या सुरवातीलाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक विश्वविक्रम मोडण्याची संधी असणार आहे. ११ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत तो मोठे टप्पे गाठण्याच्या अगदी जवळ पोहचला आहे. विराट कोहली , आता २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यापासून फक्त २५ धावा दूर आहे. हा टप्पा पार केल्यानंतर, तो ही कामगिरी करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरणार आहे. तसेच, तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा डावांच्या बाबतीत सर्वात जलद २८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचा विश्वविक्रम देखील मोडणार आहे.
आजपर्यंत केवळ दोनच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८,००० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. तसेच महान सचिन तेंडुलकर, ज्याने ६४४ डावांमध्ये २८,००० धावा फटकावल्या आहेत. तर दूसरा श्रीलंकेचा महान कुमार संगकारा, ज्याने २०१५ मध्ये भारताविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना ६६६ डावांमध्ये २८,०१६ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीला आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे. आयपीएलमध्ये ९,००० धावा करण्यासाठी त्याला फक्त ३३९ धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत, विराट कोहलीने २५९ डावांमध्ये ८,६६१ धावा काढल्या आहेत. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत रोहित शर्मा ७,०४६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहचला आहे. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकर (१८,४२६ धावा) यांच्या नावावर जमा आहे. विराट कोहलीने २९६ डावांमध्ये १४,५५७ धावा काढल्या असून १५,००० एकदिवसीय धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी ४४३ धावा कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा : 2026 ची पहिली सुपर ओव्हर सुपर किंग्जने तीन चेंडूत जिंकली! डोनोव्हन फरेराने घातला धुमाकूळ
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठण्याच्या जवळ आला आहे. त्याने आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसह ६२३ डावांमध्ये आतापर्यंत २७,९७५ धावा केल्या आहेत. जर त्याने आणखी ४२ धावा केल्या तर तो कुमार संगकाराला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी सज्ज होईल.






