Dsp And B Praak
सूर्या शिवकुमार अभिनित कांगुवा चित्रपट लवकरच ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या हा चित्रपट ॲक्शन थ्रिलर असून, हा तामिळ भाषेत आधारित आहे. कांगुवा या चित्रपटातील नुकतेच पहिल ‘फायर’ गाणं आउट झाले आहे. हे गाणं मोठे संगीतकार रॉकस्टार डीएसपी आणि बी प्राक या दोघांच्या आवाजात असून, हे गाणं सर्वत्र गाजत आहे. या गाण्यावरून हे सिद्ध होते की जेव्हा दोन संगीतकार एकत्र येतात तेव्हा कोणतेही गाणं हे नक्कीच व्हायरल होते. दिग्गज संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी आणि बी प्राक या दोघांचे “फायर” गाणं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे यात शंकाच नाही.
उत्स्फूर्त संगीत, दमदार बोल आणि कमालीची उर्जा यांच्या सहाय्याने “फायर गाणे’ ही चित्रपटाच्या अल्बमची एक झलक आहे. अलीकडेच बी प्राक यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. पॅन-भारतीय अष्टपैलू गायकाने डीएसपीला “नम्र माणूस” म्हटले होते आणि ‘मला तुमच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद’ असे तो म्हणाला होता. यापूर्वी बी प्राक आणि रॉकस्टार डीएसपी यांनी ‘सरिलेरू नीकेव्वरु’ मधील ‘सुर्युडिवो चंद्रुदिवो’ गाण्यासाठी सहकार्य केले होते, जे त्या वर्षी चार्टबस्टर्सपैकी एक म्हणून उदयास आले होते.
दरम्यान रॉकस्टार डीएसपी ‘पुष्पा 2: द रुल’ च्या नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्यांनी देशाला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज आहे. सुर्याच्या ‘कंगुवा’ व्यतिरिक्त, त्याच्या 2024 च्या लाइनअपमध्ये पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, अजितचा ‘गुड बॅड अग्ली’, नागा चैतन्यचा ‘थंडेल’ आणि धनुषचा ‘कुबेरा’ यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मैफिलींमध्ये परफॉर्म करणारा बी प्राक लवकरच आणखी काही प्रकल्पांची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.