टीव्हीचे सर्वात आवडते जोडपे म्हणून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे नाव नक्कीच घेतले जाते हे दोघेही जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बिग बॉस 15 मध्ये या दोघांची जोडी जमली होती. जेव्हाही चाहते दोघांना एकत्र पाहतात तेव्हा ते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यास मागे हटत नाहीत. आणि आता अश्यातच या दोघांच्या वेगळ्या होण्याबाबत बातमी समोर येत आहे.
तेजस्वी-करण सोशल मीडियावरही आपलं प्रेम व्यक्त करत असताना चाहत्यांना दिसत असतात, मात्र गेल्या महिनाभरापासून त्यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, दोघांनीही आपापल्या छायाचित्रांसह सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. आता दोघांनी परस्पर संमतीने विभक्त झाल्याची बातमी समोर आली आहे.
तेजस्वी आणि करण वेगळे झाले आहेत का?
न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा आता एकमेकांना डेट करत नाहीत. या जोडप्याचे ब्रेकअप होऊन एक महिना झाला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने हा खुलासा केला आहे.
त्याने म्हटले आहे की- जरी त्यांच्या ब्रेकअपचे कारण माहित नसले तरी मला एवढेच माहित आहे की गेल्या काही दिवसांपासून त्यांचे एकमेकांशी छोटे-मोठे भांडण होत आहेत.
त्यामुळे ही जोडी एकत्र दिसत आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, दोघे अजूनही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत आहेत कारण गेल्या तीन वर्षांपासून त्यांना पॉवर कपल म्हणून पाहिले जात आहे. त्यांना असं वाटतं की अचानक ब्रेकअपची बातमी दिल्याने त्यांच्या चाहत्यांची मनं तुटू शकतात आणि ती अचानक स्वीकारणं त्यांच्यासाठी सोपं राहणार नाही. दोघांनाही अद्याप त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली नाही आहे.