‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाची कथा आणि कॉमेडी पाहून प्रेक्षक लोटपोट झाले होते. आता या चित्रपटाच्या पाहिल्या भागानंतर या दिग्दर्शक विजय अरोरा आता ‘सन ऑफ सरदार 2’ चा दुसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सन ऑफ सरदार 2’ आय चित्रपटातील कथा आणि कलाकार पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
उद्योगातील एका स्वतंत्र सूत्राने खुलासा केला की, कुब्ब्रा सैतने “सन ऑफ सरदार २” मध्ये अजय देवगण, संजय दत्त आणि मृणाल ठाकूर यांच्या कास्टमध्ये सामील झाले आहे. तिच्या भूमिकेचे अद्यापही तपशील समोर आले नाही, परंतु ती एक मनोरंजक भूमिका साकारणार आहे. विजय अरोरा दिग्दर्शित या मोठ्या पडद्यावरील एंटरटेनरमधील पात्र ती साकारताना दिसणार आहे”. असे या सूत्राने सांगितले. तो पुढे म्हणाला, “कुब्बरा सैत चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरुवात करणार आहे, चित्रपटाच्या सेटचा महत्त्वपूर्ण भाग परदेशात शूट केला जाईल.” असे देखील तो म्हणाला.
हे देखील वाचा – सिद्धार्थ आनंदचा पुढील चित्रपट हा मेगा-बजेट ॲक्शन असणार? Marflix साठी केले जाहीर!
आता या चित्रपटातील अजय देवगण, संजय दत्त आणि मृणाल ठाकूरसह अभिनेत्री कुब्बरा सैतची देखील अप्रतिम भूमिका पाहायला मिळणार आहे. या स्टार सोबत ती मोठ्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. ‘सन ऑफ सरदार 2’ याचे लवकरच शूटिंगसुद्धा सुरु होणार असून, तो प्रेक्षकानाच्या भेटीस येईल. या चित्रपटामध्ये कुब्बरा सैतला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटाच्या आगमनाची उत्सुकता आता उत्कंठाला लागली आहे.
कुब्बरा सैतबद्दल सांगायचे तर, फर्जी, ट्रायल गली बॉय आणि ‘सेक्रेड गेम्स’मध्ये दिसलेली अभिनेत्री सर्वात मोठी लाइनअप आहे. सन ऑफ सरदार 2 व्यतिरिक्त, ती शाहिद कपूर स्टारर ‘देवा’ मध्ये ॲक्शन-पॅक अवतारात दिसणार आहे आणि तिने अलीकडेच डेव्हिड धवन स्टारर कॉमेडी एंटरटेनरसाठी शूटिंग सुरू केले आहे ज्यामध्ये वरुण धवन, मृणाल ठाकूर, श्रीलीला, मनीश पॉल आहेत.