(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
रणवीर इलाहाबादिया त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. त्याने ही टिप्पणी समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’ या शोमध्ये केली आहे. या युट्यूबरने पालक आणि कुटुंबाबद्दल अश्लील टिप्पणी केली आहे, त्यानंतर युट्यूबर रणवीर, कॉमेडियन समय रैना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा आणि शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. आता मुंबई पोलिसांची टीम रणवीरच्या घरी पोहोचली आहे. आणि त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
रणवीर अलाहबादियाच्या अडचणींमध्ये वाढ, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष!
टीम पोहोचली युट्यूबर रणवीरच्या घरी
वृत्तसंस्था एएनआयनुसार, मुंबई पोलिसांचे एक पथक आज मंगळवारी युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या घरी पोहोचले आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये रणवीरने केलेल्या अश्लील कमेंट्सवरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात अजून अधिक माहिती येणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आता या प्रकरणामुळे पोलीस आता ॲक्शन मोडवर आहेत.
A team of Mumbai Police has reached YouTuber Ranveer Allahabadia’s residence, following the stir around his comments on a show. More details awaited: Mumbai Police
Yesterday, a complaint was filed against Ranveer Allahabadia, social media influencer Apoorva Makhija, comedian…
— ANI (@ANI) February 11, 2025
कडक कारवाईची मागणी
रणवीर इलाहाबादिया हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याच्या यूट्यूब पॉडकास्टमध्ये, तो चित्रपट क्षेत्रातील व्यक्तिरेखा आणि दिग्गजांशी चर्चा करताना दिसतो. इंस्टाग्रामपासून ट्विटरपर्यंत, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे चाहते खूप आहेत. पण, त्याने अलीकडेच समय रैनाच्या शोमध्ये ज्या प्रकारच्या कमेंट केल्या त्यामुळे वापरकर्ते संतापले आहेत. रणवीर आणि समय रैना यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. चित्रपटसृष्टीतील आणि राजकीय वर्तुळातील सेलिब्रिटींनीही रणवीरच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.
‘Immature लोकांच्या चुकांकडे…’, रणवीर इलाहाबादियाच्या अश्लील टिप्पणीवर इम्तियाज अलीची प्रतिक्रिया!
वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या प्रकरणी युट्यूबला नोटीस बजावली होती. तसेच, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुंगो यांनीही व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली होती. यावर युट्यूबने कारवाई केली आहे आणि अशा अश्लील टिप्पण्या करणारा व्हिडिओ त्यांनी काढून टाकला आहे.