बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी नेहमीच तिच्या अभिनयासह फॅशनसाठीही चर्चेत असते. अभिनेत्रीच्या फिटनेटनेसवरही चाहते फिदा आहेत. तसेच नर्गिस फाखरीचा चाहता वर्ग देखील सोशल मीडियावर जास्त आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत उपडेट देताना दिसत असते. अभिनेत्रीचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने लाल आणि ऑफ व्हाईट पोशाख परिधान केला आहे. तसेच अभिनेत्रीचा हा आकर्षक पारंपारिक लुक पाहून चाहत्यांचे लक्ष तिच्या पोशाखाकडे वेधले गेले आहे.
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
नर्गिस फाखरीने पहिल्या फोटोमध्ये ऑफ व्हाईट रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच आकर्षित आणि सुंदर दिसत आहे.
तसेच अभिनेत्रीच्या या परिधान केलेल्या लेहंग्यावर मिरर डिजाईन आहे. ज्यामुळे तिचा लुक खूप मोहक दिसत आहे.
अभिनेत्रीने या ऑफ व्हाईट रंगाच्या लेहंग्यावर अप्रतिम आणि साधा मेकअप निवडला आहे. तसेच तिने कानात मोठे झुमके आणि हातात मोत्यांचा कडा घातला आहे.
अभिनेत्रीच्या दुसऱ्या फोटोमध्ये तिने लाल रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे. यामध्ये नर्गिस खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तिने या साडीवर आकर्षित मेकअप केला आहे. नर्गिसने साडीवर आपले सिल्की केस मोकळे ठेवले आणि आणि सुंदर दागिन्यांसह आपला लुक परिपूर्ण केला आहे.
तसेच शेवटच्या फोटोमध्ये अभिनेत्रीने भरीव आणि नक्षीदार लेहंगा परिधान केला आहे. ज्यामध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. अभिनेत्रीचे हे पारंपारिक पोशाखामधील लुक पाहून चाहते तिच्या पुन्हा एकदा प्रेमात पडले आहे.