(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नव्या वर्षातील आगामी चित्रपट ‘आझाद’चे नुकतेच टीझर रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज रिलीज केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये राशा थडानीचा एक नवीन आणि ताजा चेहरा दाखवण्यात आला आहे, जो नेहमीसारखा गोड आणि सुंदर दिसत आहे. तिच्या आकर्षक आणि निरागस प्रतिमेने चाहत्यांची मने आधीच जिंकली आहेत. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेत्रीचा नवा अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री नवीन पात्र साकारताना दिसणार आहे.
हे देखील वाचा- स्वप्नील जोशी निर्मित “सुशीला – सुजीत” चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!
‘आझाद’चे नवीन पोस्टर झाले रिलीज
‘आझाद’चे पोस्टर पाहून राशाने आधीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ती उद्योगातील सर्वात लोकप्रिय नवीन चेहऱ्यांपैकी एक आहे. तिच्या पदार्पणापूर्वीच, ती चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ती तिच्या विलक्षण प्रतिभा आणि आकर्षक स्क्रीन उपस्थितीने प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. अमान देवगण सोबत पदार्पण करणारी राशा थडानी तिच्या विलक्षण प्रतिभा आणि आकर्षक पडद्यावरील उपस्थितीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल यात शंकाच नाही.
या चित्रपटात महाराणा प्रताप यांची कथा दाखवण्यात आली आहे. हल्दीघाटीची लढाई या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा भाचा अमान देवगण या चित्रपटामध्ये रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. ‘आझाद’ चित्रपटामध्ये प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘आझाद’ या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर लोकांना खूप आवडला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण, रशा थडानी आणि अभिनेत्याचा भाचा अमान देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘आझाद’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे, ज्याने यापूर्वी केदारनाथ, काई पो चे आणि रॉ ऑन सारखे अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहेत.
हे देखील वाचा- आलिया अन् रणबीरची ‘राहा’ झाली २ वर्षांची; वाढदिवसानिमित्त आजी नीतू कपूरने शेअर केला खास फोटो!
कधी रिलीज होणार आझाद?
चित्रपटाचे पोस्टर आता नुकतेच रिलीज झालेला टिझर पाहिल्यानंतर ‘आझाद’च्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटामध्ये नक्की काय दाखवणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. विशेष म्हणजे अजय देवगणच्या उपस्थितीमुळे या चित्रपटाला अधिक वजन मिळत आहे. अमान देवगणचा डेब्यू सिनेमा आझादच्या रिलीज डेटवर नजर टाकली तर हा सिनेमा पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यातून प्रेक्षकांना सिनेमाचा एक नवा साहस रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. स्पष्टपणे सांगायचे झाले तर नवीन वर्षाची सुरुवात ‘आझाद’ चित्रपटाच्या रिलीजने धमाकेदार होणार आहे.