मराठी अभिनेता स्वप्नील जोशी 'नाच गं घुमा' आय चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्याने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. स्वप्नील जोशी निर्मित "सुशीला - सुजीत" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करत आहे. अभिनेता लेखक जितेंद्र जोशी यांच्या विशेष उपस्थितीत चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असून चित्रपटाच्या शूटचा श्री गणेशा झाला आहे. चित्रपटामधील कलाकारांनी दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाने शूटिंगची सुरुवात केली आहे.
स्वप्नील जोशी निर्मित "सुशीला - सुजीत" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
2024 वर्षात स्वप्नील जोशीने एक वेगळी भूमिका बजावली आणि त्याने अभिनयासोबतच निर्मिती विश्वात पदार्पण केले आहे. नाच गं घुमा चित्रपटाची निर्मितीनंतर आता पुन्हा एकदा स्वप्नील नव्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
आगामी " सुशीला सुजीत " या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करणार आहे. स्वप्नीलच्या सोबतीने अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
मराठीमधील बडे कलाकार या चित्रपटासाठी निर्माते झाले असून आता या चित्रपटाची स्टार कास्ट काय असणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. चित्रपटाचा मुहूर्त देखील तितकाच खास ठरला आणि याच कारण देखील तेवढं खास आहे.
आघाडीचा अभिनेता लेखक निर्माता जितेंद्र जोशी याने या चित्रपटाच्या मुहूर्तला खास हजेरी लावून चित्रपटाचा मुहूर्त खास केला आहे. जितेंद्र जोशी हा या सगळ्यां निर्मात्याचा लाडका मित्र तर आहे आणि म्हणून लाडक्या जवळच्या मित्राच्या हातून या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे.
दगडूशेठ गणपतीच्या बाप्पाच दर्शन घेऊन या नव्या चित्रपटाचा श्री गणेशा झाला आहे. चित्रपटाची कथा काय असणार , कोण कलाकार यात दिसणार हे अजून तरी गुलदस्त्यात असलं तरी लवकरच याबाबत सर्व माहिती प्रेक्षकांपर्येंत येईल अशी आशा आहे.