राधिका मदान ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. राधिकाने अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच ती अंग्रेजी मीडिअम आणि शिद्दत या चित्रपटामधून प्रसिद्ध झाली. राधिका मदानने अनेक हिंदी मालिकेमध्ये सुद्धा काम केले आहे. आणि आता ती अक्षय कुमारसह ‘सरफिरा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. अक्षयसोबत ती सुद्धा मुख्यभिमकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती ‘राणी’ चे पात्र साकारत असून, या मध्ये ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
वास्तविक जीवनातील कथेवर आधारित, या चित्रपटात राधिका मदन राणीच्या भूमिकेत असून तिची भूमिका ही एक आकर्षक मराठी पात्र साकारणारी आहे. हे नाकारता येत नाही की तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेमध्ये पाऊल टाकण्यापूर्वी राधिका नेहमी दिलेल्या व्यक्तिरेखेचे स्वरूप जाणून घेते आणि यावेळी तिने संपूर्ण महाराष्ट्रीयन मुलीचे पात्र हाती घेतले आणि संस्कृतीची सत्यता समोर पडद्यावर आणली आहे.
अक्षय कुमार आणि राधिका मदन स्टारर सरफिरा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी ‘चावट’ नावाच्या नवीन ट्रॅकचे अनावरण केले. हे पारंपारिक महाराष्ट्रीयन लग्नाचा आनंद उत्तम प्रकारे कॅप्चर करणारे गाणे आहे, यामुळे प्रत्येक लग्नाच्या गाण्याच्या यादीत याचासुद्धा समावेश होईल यात शंकाच नाही. दोन मिनिटे 36 सेकंदांचे महाराष्ट्रीयन थीम असलेले हे गाणे या हंगामातील प्रत्येक उत्सवाचे आकर्षण ठरले आहे. या गाण्यात अक्षय आणि राधिका प्रेमात पडतात आणि त्यांच्या लग्नानंतर खूप मजा मस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे.
मनोज मुन्ताशिर शुक्ला यांनी लिहिलेले, चावट हे गीत प्रेम आणि उत्सवाचा आनंद देणारे गीत आहेत. G. V. प्रकाश कुमार यांनी गाण्याची रचना नव्या प्रकारे केली आहे त्यामुळे यावर धमाकेदार नुत्य रचणे गरजेचे होते.’ असे त्यांनी सांगते तसेच या गाण्याला संगीतकार श्रेया घोषाल चा सुरेख आवाज लाभला आहे.
या चित्रपटामधील ट्रेलरमध्ये आणि गाण्यांमधून राधिका मदन संपूर्ण मराठी मेकओव्हरमध्ये दिसली आहे आणि तिच्या चाहत्यांना तिने थक्क केले आहे. तिची केशरचना, पारंपारिक साडी आणि दागिने या सर्व गोष्टी अतिशय बारकाईने व्यक्तिरेखेचा साज हस्तगत केला आहे, जे एक अलौकिक सौंदर्य पसरवतात. अनेक उल्लेखनीय परफॉर्मन्स दिल्यानंतर, अभिनेत्री ‘सरफिरा’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे ज्यात स्वतः आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाची आतुरता चाहत्यांना लागली आहे.