भारतीय गायक राहुल वैद्य याने पत्नी दिशा परमारला तिच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देण्यासाठी एक गोड नोट शेअर केली आहे. तसेच त्याने त्याच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमारने 11 नोव्हेंबर रोजी तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगानिमित्त ती आणि तिचा नवरा राहुल वैद्य आणि त्यांची गोंडस मुलगी दिल्लीतील बांगला साहिब गुरुद्वाराला सहलीला गेले. अभिनेत्याने या सुंदर ठिकाण्यावरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हे छोटं कुटुंब खूपच आनंदी दिसत आहे.
राहुल वैद्यने पत्नी दिशाला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
पहिल्या काही फोटोंमध्ये दिशाने हिरव्या रंगाचा सूट परिधान केला आहे. तिच्या डोक्यावर मॅचिंग ओढणी देखील दिसत आहे. काळा शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान करून गायक राहुल वैद्य देखील हँडसम दिसत आहे.
दुसरीकडे, त्यांची लहान मुलगी नव्या गुलाबी बार्बी टी आणि डेनिम जीन्समध्ये खूप गोंडस दिसत होती. तिघांचे कुटुंब गुरुद्वारात प्रार्थना करताना दिसले. आणि त्यांची धमाल देखील या फोटोमध्ये दिसून येत आहे.
पोस्ट शेअर करत राहुलने पत्नीला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा मेरी प्यारी सरदारनी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो येत्या काही वर्षांत तुला उत्तम आरोग्य आणि नशीब मिळो.." राहुलच्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्रीवर चाहत्यांसह आता अनेक कलाकार देखील शुभेच्छाचा वर्षाव करताना दिसत आहे. चाहते या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत आहे. राहुल आणि दिशाची पहिली भेट 'बिग बॉस' घरात झाली.
'बिग बॉस १४' मध्ये राहुलने दिशाला प्रोपोस केले आणि नंतर या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. त्यांनी लगेच काही दिवसानंतर एकमेकांसोबत लग्न केले आणि आता त्यांना एक गोंडस मुलगी देखील आहे.