"मी काम करतो आणि ती आराध्याला..." घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल मन मोकळं केलं
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. चित्रपटामध्ये अभिषेक कॅन्सर आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांची भूमिका साकारतोय. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिषेक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण प्रमोशन दरम्यान अभिषेकने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्वत: ऐश्वर्याचं कौतुक करत होणाऱ्या चर्चा खोट्या ठरवत पत्नीबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.
‘मंजुम्मेल बॉईज’ फेम अभिनेत्याला अटक, नेमकं काय आहे प्रकरण
‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने त्याचे आईशी, मुलीशी आणि ऐश्वर्याशी असलेल्या नात्यावर भाष्य केलं. मुलाखती दरम्यान अभिनेता म्हणाला की, “माझ्या लहानपणी मला केव्हाच माझ्या आई- वडिलांनी एकटं वाटून दिलं नाही. माझ्या जन्मानंतर आईने अभिनयातून ब्रेक घेतला. कारण, तिला मुलांसोबत वेळ घालवायचा होता. त्यावेळी आमच्यासोबत बाबा केव्हाही नसायचे. पण बाबांची कमतरता आम्हाला केव्हाच आईने भासून दिली नाही.”
त्यानंतर पुढे अभिषेकने ऐश्वर्याचेही आभार मानले. अभिषेक म्हणाला की, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण मला माहित आहे की, ऐश्वर्या घरी मुलगी आराध्यासोबत आहे त्यासाठी मी तिचा खूप आभारी आहे. मला असं वाटतं की, मुलं केव्हाच तुमच्याकडे तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहत नाहीत. ते तुम्हाला नेहमीच पालक म्हणून पाहतात. जसे की, आपल्याकडे आपले आई वडील पाहतात.”
LG इलेक्ट्रॉनिक्स अॅंड KCC K-POP स्पर्धा: गायनात अभिप्रिया चक्रबोर्ती आणि नृत्यात दि ट्रेंड विजयी
१९७६ मध्ये अभिषेकचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी स्वत:ला अभिनयापासून दूर केले होते. त्यावेळी त्यांचे वडील अमिताभ बच्चन हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक होते. ऐश्वर्या- अभिषेकचे २००७ मध्ये लग्न झाले होते. अभिषेक आणि ऐश्वर्याला २०११ मध्ये मुलगी आराध्या झाली. नुकताच आराध्याने तिचा १३ वा वाढदिवस आई ऐश्वर्यासोबत साजरा केला. आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी अभिषेक दिसला नव्हता.
आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने फिल्म इंडस्ट्रीत चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ऐश्वर्याने २०१५ मध्ये ‘जज्बा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. गेल्या काही वर्षांत, अभिनेत्री केवळ काही मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. यामध्ये ‘सरबजीत’, ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘फन्ने खान’ सारखे चित्रपट आणि ‘पोनियान सेल्वन’ सारख्या फ्रेंचायझीमध्ये दिसलीये.