Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आलिया भट्टची ‘तुंबाड २’मध्ये सरप्राईज एन्ट्री! नवाजुद्दीन-सोहम शाहसोबत रंगणार थरार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

कल्ट चित्रपट 'तुंबाड'च्या बहुप्रतीक्षित सिक्वेलमध्ये आलिया भट्टची अधिकृत एन्ट्री झाली आहे. सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकींसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असून चित्रपटाची तारीख देखील समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 11:25 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Alia Bhatt in Tumbbad 2: भारतीय सिनेमातील कल्ट चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘तुंबाड’च्या सिक्वेलबाबत आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या एन्ट्रीनंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट अधिकृतपणे ‘तुंबाड २’चा भाग बनली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात आलिया पहिल्यांदाच अभिनेता-निर्माते सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

‘तुंबाड’ने भारतीय सिनेमात लोककथा, फँटसी आणि हॉरर यांचा अनोखा संगम सादर करत वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रभावी कथा, दमदार दृश्यरचना आणि गूढ वातावरणामुळे या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले. पुनर्प्रदर्शनानंतरही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या री-रिलीज चित्रपटांपैकी एक ठरला.

आता ‘तुंबाड २’ अधिक भव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार असून, आलिया भट्टच्या सहभागामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. विविध धाटणीच्या भूमिका प्रभावीपणे साकारणारी आलिया या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सोहम शाह यांनी उभारलेल्या या सिनेमॅटिक विश्वात तिची एन्ट्री हा चित्रपटासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली, “‘तुंबाड’ मी पहिल्यांदा पाहिल्यापासून तो माझ्या मनात कायम राहिला आहे. इतकं समृद्ध आणि गूढ विश्व फार कमी चित्रपट निर्माण करतात. त्या विश्वाचा भाग होण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप खास आहे. सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. या अनोख्या कथेत महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे.”

केवळ भाषांतर नाही तर…; १४ भाषांमध्ये डब होणारी Heeramandi ठरली पहिली भारतीय सिरीज! ४३ देशांमध्ये ‘टॉप १०’ मध्ये स्थान

अभिनेता आणि निर्माता सोहम शाह यांनीही आलियाच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. “आलिया या पिढीतील सर्वाधिक प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘तुंबाड २’मध्ये प्रेक्षकांना तिचा पूर्णपणे वेगळा अवतार पाहायला मिळेल. तिच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे,” असे त्यांनी सांगितले.

निर्माते डॉ. जयंतीलाल गडा म्हणाले की, “‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’नंतर आलियासोबतचा हा आमचा तिसरा प्रकल्प आहे. ती या चित्रपटासाठी सर्वोत्तम निवड असून, तिच्या सहभागामुळे ‘तुंबाड २’ची उंची निश्चितच वाढेल.”

Sohum Shah Films आणि Pen Studios यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जाणारा ‘तुंबाड २’ चित्रपट आदेश प्रसाद दिग्दर्शित करत आहेत. बहुप्रतीक्षित हा चित्रपट ३ डिसेंबर २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Payal Rohatgi Exclusive Interview: ‘चांगली अभिनेत्री व्हायचं असेल तर…’, बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दिला ‘हा’ खास मंत्र

Web Title: Surprise entry for alia bhatt in tumbbad 2 to share the screen with sohum shah and nawazuddin siddiqui for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • aalia bhatt
  • Bollywood Actress
  • bollywood movies

संबंधित बातम्या

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
1

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज
3

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज

Ramayana Movie New Poster : रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची नवी झलक! अरुण गोविल साकारणार राजा दशरथ, ‘रामायणम्’चे पोस्टर्स चर्चेत
4

Ramayana Movie New Poster : रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची नवी झलक! अरुण गोविल साकारणार राजा दशरथ, ‘रामायणम्’चे पोस्टर्स चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.