The Bengal Files Trailer (Photo Credit- X)
The Bengal Files Trailer Release: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या आगामी ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाचा ट्रेलर (The Bengal Files Trailer Release) नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमधील जबरदस्त सीन्स पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील. हा ट्रेलर झी स्टुडिओजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अनुपम खेर (Anupam Kher) आणि दर्शन कुमार (Darshan Kumar) यांचे जबरदस्त संवाद आहे. चाहते ट्रेलरच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार व्यक्त करत आहेत. हा चित्रपट १९४६ साली झालेल्या कोलकाता दंगलींवर आधारित आहे.
ट्रेलरमध्ये चित्रपटातील कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. त्यांचे संवादही प्रभावी आहेत. ‘द बंगाल फाइल्स’ मध्ये अनुपम खेर, दर्शन कुमार, पालोमी घोष, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, ‘‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट केवळ बंगालमधील लोकांसाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी आहे.’
दुसऱ्या युजरने लिहिले, ‘सत्य दाखवण्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. जय हिंद, जय भारत.’
तिसऱ्या युजरने लिहिले, ‘अंगावर शहारे आले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार.’
चौथ्या युजरने लिहिले, ‘हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरेल.’
पाचव्या युजरने लिहिले, ‘दर्शन कुमार पुन्हा एकदा दिग्गज कलाकारांसोबत काम करताना दिसत आहेत, जे पाहणे खूप आनंददायी आहे.’
दरम्यान ट्रेलर लाँचचा कार्यक्रम वेळी गोंधळ निर्माण झाल्याने विवेक अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त करत थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्याचा कार्यक्रम सुरुवातीला दुपारी १२ वाजता नियोजित होता, परंतु नंतर तो एक तास उशिरा सुरू झाला. कार्यक्रमादरम्यान गोंधळ वाढल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि कार्यक्रम थांबवावा लागला. विवेक अग्निहोत्री यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आणि ‘द बंगाल फाइल्स’च्या प्रदर्शनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला.
विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “मी अमेरिकेतून कोलकाता विमानतळावर पोहोचताच मला सांगण्यात आले की, ‘द बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स चेनने राजकीय दबावामुळे आणि संभाव्य राजकीय तणावामुळे कार्यक्रम घेण्यास नकार दिला. आम्ही दुसऱ्या एका मल्टिप्लेक्सशी संपर्क साधला, पण त्यांनीही तोच राजकीय दबाव असल्याचं कारण दिलं. हे आम्हाला आधीच कळलं असतं, तर आम्ही एवढ्या टीमला आणि कलाकारांना घेऊन इथे आलोच नसतो.”