फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉस 18 चा या वीकेंडचा वीकेंड वॉर खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळी घरात एकीकडे सलमान खान कुटुंबातील सदस्यांना क्लास देताना दिसणार आहे. दुसरीकडे, या आठवड्यात एक नव्हे दोन जणांना घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. अशा परिस्थितीत आता ‘मिड वीक इव्हिक्शन’मध्ये या वाईल्ड कार्ड ब्युटीच्या हकालपट्टीची बातमी समोर आली आहे. या आठवड्याच्या नॉमिनेशनच्या वेळी बिग बॉसने घरामध्ये नवीन आलेल्या वाईल्ड कार्ड सदस्यांना सूचित केले होते की जर तुम्ही या आठवड्यामध्ये घरात नाती तयार केली नाहीत तर तुम्हाला या आठवड्यात घराबाहेर काढले जाणार आहे. आजच्या आगामी भागामध्ये आता तीन वाईल्ड कार्ड सदस्यांपैकी एक सदस्याला घराबाहेर काढले जाणार आहे.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अलीकडेच बिग बॉस 18 मध्ये, तीन वाईल्ड कार्ड स्पर्धक एडन रोज, अदिती मिस्त्री आणि यामिनी मल्होत्रा यांनी वाईल्ड कार्ड म्हणून घरात प्रवेश केला आहे. त्याच वेळी, आता फक्त या तीन वाईल्ड कार्ड सदस्यांना धोका आहे. बिग बॉसने नुकतेच जाहीर केले होते की, जे या घरात नाते निर्माण करू शकणार नाहीत, बिग बॉसने नुकतेच या तिघांना सांगितले होते की, घरातील सदस्यांसोबत बांधलेले नाते हे ठरवेल की कोण घरात राहणार आणि कोण बाहेर जाणार. अशा परिस्थितीत बिग बॉस 18 च्या या इविक्शन टास्कमध्ये अदिती मिस्त्रीला घरच्यांनी बाहेर काढल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाबाबत निर्माते किंवा चॅनलकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
#AditiMistry has been eliminated from the Bigg Boss 18 house !! #BiggBoss18 #BiggBoss @BB24x7_ pic.twitter.com/fnF7XSLz1v
— BiggBoss24x7 (@BB24x7_) November 28, 2024
सोशल मीडियावर एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये आता नवीन आलेल्या वाईल्ड कार्ड सदस्यांमध्ये कोण घराबाहेर जाणार हे बिग बॉस जुन्या सदस्यांवर अवलंबून असणार आहे. यामध्ये आता घरच्यांनी या तीन सदस्यांमध्ये दिग्विजयने अदितीचे नाव घेतले आहे, तर रजत दलालने सांगितले की एडिनचे या घरामध्ये योगदान जास्त आहे. तर करणवीर मेहराने देखील एडिनचे घरातले योगदान जास्त असल्याचे सांगितले आहे.
BIGG BOSS 18 PROMO #EishaSingh Aur #AvinashMishra Ke Rishtey Mein Aayi Daraar, aur Edin, Yamini & Aditi mein se kon hoga show se bahar?? #BiggBoss18 #BB18 #BiggBoss pic.twitter.com/MuPlM4Q5ly
— BiggBoss24x7 (@BB24x7_) November 28, 2024
बिग बॉस 18 मध्ये गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात देखील 7 स्पर्धकांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. या यादीत दक्षिणेतील अभिनेत्री श्रुतिका अर्जुन, राजकारणी तेजिंदर बग्गा, ‘लाइफ कोच’ सना अरफीन खान, ‘स्प्लिट्सव्हिला’ फेम कशिश कपूर, करणवीर मेहरा, विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. अदिती मिस्त्रीच्या हकालपट्टीची बातमी खरी ठरली तर आता पुढे कोण होणार हे पाहायचे आहे.