(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
1990 च्या दशकात बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील संबंध खूप चर्चेत होते. शाहरुख खान, करण जोहर, राकेश रोशन यांसारख्या अनेक कलाकारांना धमक्या मिळाल्या होत्या, तर काहींची गुन्हेगारी जगतातील लोकांशी मैत्री असल्याच्याही चर्चा होत्या. आता अभिनेता वरुण धवन यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांच्या कुटुंबालाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या, ज्यामुळे त्यांना एक दिवसासाठी आपले घर सोडून दुसरीकडे राहावे लागले होते.
हास्यजत्रेतील आणखी एका अभिनेत्याचा अपघात; बदलापूरात घडली धक्कादायक घटना
वरुण धवन यांनी ‘युवा’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्या काळातील अनुभव शेअर करत सांगितले की, त्या वेळी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना अंडरवर्ल्डकडून फोन येत होते. “आम्हालाही असे फोन येत होते आणि ते बराच काळ येत राहिले. मात्र, आम्हाला त्याची जाणीव नव्हती, कारण फोन करणाऱ्याशी आमचा स्टाफच वाद घालत होता. इतकंच नाही, तर स्टाफने आमचा घराचा पत्ताही सांगितला आणि त्या व्यक्तीला ‘इथे ये, गार्डनमध्ये भेट, तिथेच तुला मारतो’ असेही म्हटले,” असा खुलासा अभिनेत्याने केला आहे.
वरुण धवनने पुढे सांगितले की, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांच्या वडिलांना, डेव्हिड धवन यांना थेट फोन करून धमकी देण्यात आली. “त्या व्यक्तीने सांगितले की प्रकरण आता गंभीर झाले आहे आणि तो बंदूक घेऊन येणार आहे, कारण त्याला आमच्या घराचा पत्ता आणि ऑफिसची वेळ सगळं माहीत झालं आहे. पप्पांनी विचारलं की ही माहिती कोणी दिली, तर त्याने स्टाफमधील एका सदस्याचे नाव घेतले. त्यामुळे आम्हाला एक दिवसासाठी आमचे घर सोडून दुसरीकडे जाऊन राहावे लागले. हे ऐकायला थोडं विनोदी वाटतं, पण प्रत्यक्षात तो अजिबात विनोद नव्हता,” असा खुलासा त्याने केला आहे.
हास्यजत्रेतील आणखी एका अभिनेत्याचा अपघात; बदलापूरात घडली धक्कादायक घटना
वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर यंदा जानेवारीमध्ये तो सनी देओल यांच्यासोबत ‘बॉर्डर २’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने जगभरात सुमारे 450 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंग, सोनम बाजवा, मेधा राणा आणि अन्या सिंग यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
याशिवाय, ते लवकरच ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटात झळकणार आहे, जो जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच जिमी शेरगिल, मौनी रॉय आणि रोहित सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. अशातच आता चाहते या चित्रपटासाठी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.






