(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्या बालनला १७ वर्षांनंतर चाहते मंजुलिकाच्या भूमिकेत पाहणार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, राजपाल यादव आणि इतर कलाकार देखील काम करताना दिसणार आहेत. कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अमी जे तोमार 3.0′ गाणं लाँच
‘भूल भुलैया 3’मध्ये विद्या बालन पुन्हा मंझुलिका म्हणून परतली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील तिची झलक प्रेक्षकांना खूप आवडली असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अमी जे तोमार 3.0’ या गाण्याने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या गाण्यात विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा डान्स परफॉर्मन्स आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या या गाण्याच्या लाँचिंग कार्यक्रमाला चित्रपटाची टीम उपस्थित होती आणि यावेळी विद्या आणि माधुरीने लिव्ह परफॉर्मन्स देऊन या गाण्याची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हे देखील वाचा – ‘दोन-तीन महिने दिसत नव्हते;’ अजय देवगणला ‘सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान दुखापत, डोळ्याची केली सर्जरी!
विद्या बालनने दिली प्रतिक्रिया
परफॉर्मन्सदरम्यान विद्या बालनने तिचा तोल थोडासा गमावला, पण तिने ते सुंदरपणे हाताळले आणि पूर्ण ‘हार न मानता’ शैलीत परफॉर्मन्स सुरू ठेवला. अलीकडेच विद्या बालनने या लाइव्ह परफॉर्मन्सच्या रिहर्सलचा पडद्यामागील व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, 12 वर्षांतील हा तिचा पहिला लिव्ह स्टेज परफॉर्मन्स होता आणि त्यांनी माधुरीसोबत रिहर्सल केली नव्हती. असे अभिनेत्रीने सांगितले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, विद्या बालनने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले, ‘द शो मस्ट गो ऑन’, ऐकलं होत परंतु आता ते करूनही दाखवले. माधुरीजींसोबत स्टेज शेअर करताना खूप छान वाटले…तुमच्या सौम्यता आणि उदारतेसाठी.” खूप खूप धन्यवाद. आणि टीमने मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद’. असे लिहून अभिनेत्रीने सगळ्याचे आभार मानले आहेत. आणि प्रेक्षक आणि सोशल मीडियावर प्रेम पाठवणाऱ्या प्रत्येकाचे सर्वात मोठे आभार.’ असे देखील अभिनेत्रीने लिहिले आहे.
हे देखील वाचा – Mirzapur The Film: ओटीटी नाही; आता मिर्झापूर चित्रपटगृहात करणार धुमाकूळ, चाहत्यांचा दिला सुखद धक्का!
सिंघमसोबत या चित्रपटाची होणार टक्कर
‘आमी जे तोमर’च्या नवीन आवृत्तीला श्रेया घोषालने तिचा आवाज दिला आहे तर चिन्नी प्रकाशने नृत्यदिग्दर्शन केले आहे. समीरने त्याचे बोल लिहिले आहेत. तसेच प्रीतम आणि अमाल मलिक यांचे संगीत आहे. ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट येत्या १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच, रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनशी या चित्रपटाची टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि करीना कपूरसारखे स्टार्स दिसणार आहेत.