(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ओटीटी प्लॅटफॉर्म मिर्झापूरच्या सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजच्या चौथ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. यंदाचा तिसरा सीझन प्रचंड गाजला, पण त्याचवेळी मुन्ना भैयाच्या अनुपस्थितीने चाहते दु:खी झाले. मात्र, दिवाळीपूर्वी निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. क्राइम थ्रिलर वेब सिरीज मिर्झापूर पुन्हा परतत असून यावेळी ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे तर चित्रपगृहात दाखल होणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओने मिर्झापूर चित्रपटाची घोषणा केली आहे जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे ऐकून चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे.
मिर्झापूरला चित्रपटाची पहिली झलक
विशेष म्हणजे मुन्ना भैय्यानेही मिर्झापूर या चित्रपटात प्रवेश केला आहे. मुन्ना भैय्यासोबत या चित्रपटात कंपाउंडर (अभिषेक बच्चन) देखील दिसणार आहे. मिर्झापूर चित्रपटाची पहिली झलक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. टीझरसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “आता जागा मोठी होईल आणि पडदाही मोठा होईल.”
हे देखील वाचा – Bigg Boss 18 : कॉफीवरून बिग बॉसच्या घरात बाचाबाची! करणवीर मेहराने अविनाशला धमकावलं
गादीसाठी होणार गदारोळ
टीझर पाहता, यावेळी सिंहासनासाठी कालिन भैय्या (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल) आणि मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) यांच्यात महायुद्ध होणार असल्याचे दिसते आहे. टीझरमध्ये कालिन भैय्या म्हणताना दिसत आहेत की, “तुम्हाला सिंहासनाचे महत्त्व माहित आहे. शक्ती, नियंत्रण बोलावा. तुम्हीही मिर्झापूरला तुमच्या सिंहासनावर बसलेले पाहिले असेल. यावेळी तुम्ही सिंहासनातून उठला नाही तर धोका आहे.” असे या टीझरमध्ये दिसून येत आहे.
कालिन भैय्या नंतर गुड्डू पंडित घुसला जो म्हणतो, “कालिन भैय्या एकदम बरोबर होते. रिस्क घेणं हा माझा यूएसपी आहे. मी तो आहे जो सर्व गेम बदलु शकतो. असे असेल तर मिर्झापूर तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला मिर्झापूरला यावं लागेल.” असे त्यात तो म्हणताना दिसत आहे.
हे देखील वाचा –Aditi Rao Hydari Birthday: ‘बिब्बोजान’आधी अदिती रावच्या या पात्रांनी जिंकले होते चाहत्यांचे मन, मिळाली प्रसिद्धी!
मुन्ना भैया पुन्हा परतला
मुन्ना भैया मिर्झापूर मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये नव्हता त्यामुळे त्याला चाहत्यांनी खूप मिस केले. मात्र आता तो चित्रपटात पुनरागमन करत आहे. मुन्ना भैया म्हणाले, “आम्ही हिंदी चित्रपटांचे नायक आहोत आणि हिंदी चित्रपट फक्त थिएटरमध्येच बघितले जातात. म्हणालो होतो ना, आम्ही अमर आहोत. आता इथूनच मिर्झापूरच्या गादीवर राज्य करू.” असे म्हणून या चित्रपटाचा टीझर तिथे पूर्ण झालेला दिसत आहे.
मिर्झापूर चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
मिर्झापूर चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सध्या फक्त तीन स्टार्स दिसत आहेत, बाकीच्या कलाकारांमध्ये कोणाचा समावेश आहे? याबाबत अद्यापही काही स्पष्ट झाले नाही आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग करत आहेत. हा चित्रपट 2024 किंवा 2025 मध्ये नाही तर 2026 मध्ये रिलीज होणार आहे. ज्याची चाहत्यांना खूप आतुरता लागली आहे.