Sonakshi Sinha (फोटो सौजन्य -Inatagram)
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीचे लग्न साधे पण मनोरंजक होते आणि तिच्या भव्य रिसेप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सोनाक्षी सिन्हाचे लग्न एका खाजगी समारंभात पार पडले, ज्यात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. याचदरम्यान आता सोनाक्षी सिन्हाने लो प्रोफाइल लग्न करण्यामागचे कारण सांगितले आहे.
हीरामंडीनंतर सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी ‘काकुडा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. जिथे त्याने झहीर इक्बालसोबतच्या लग्नाबद्दलही चर्चा केली.
खाजगी होते सोनाक्षी आणि झहीरचे लग्न
सोनाक्षी आणि तिचा पती झहीर इक्बाल यांनी त्यांचे लग्न साधेपणाने ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा एक खाजगी कार्यक्रम ठेवला, ज्यामध्ये फार मर्यादित लोकांना आमंत्रित केले गेले होते. लग्नाविषयी मुलाखतीत बोलताना सोनाक्षी म्हणाली, “आम्ही एकमेकांसोबत होतो आणि हे असे काहीतरी आहे जे आम्हाला खूप दिवसांपासून करायचे होते आणि आम्हाला ते कसे करायचे आहे याबद्दल खूप स्पष्ट होतो, आम्हा दोघांनाही हे लग्न साधे आणि छोटे ठेवायचे होते.” असे तिने या मुलाखतीत सांगितले.
सोनाक्षीला टेंशन नको होते
लग्नाच्या दिवसाचे वर्णन करताना अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला कोणताही ताण घ्यायचा नव्हता, त्यामुळे माझे घर मोकळे होते. जेव्हा मी माझे केस आणि मेकअप करून घेत होते, तेव्हा प्रत्येकजण ये-जा करत होता. घरात मित्र-मैत्रिणीसुद्धा रमल्या होत्या. पूर्ण कुटुंब यामध्ये सहभागी झाले होते. आरामशीर, अन्न तयार केले जात होते, म्हणून ते खरोखर घरगुती आणि सुंदर होते जसे मला हवे होते.” असे तिने या मुलाखतीत सांगितले.
सोनाक्षीचे रिसेप्शन भव्य होते
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न भलेही साधे झाले असेल, पण त्यांचे रिसेप्शन भव्य आणि संस्मरणीय होते. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये आयोजित या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये सलमान खान, रेखा, सायरा बानो आणि हनी सिंग यांसारख्या प्रसिद्ध स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. हे लग्न खूप साधे झाल्यामुळे सोनाक्षीच्या चाहत्यांना देखील हे लग्न जास्त आवडले होता.