(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय आज समोर येणार आहे. संपूर्ण देश सध्या युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्याबद्दल बोलत आहे. दरम्यान, आता दोघांनीही कायमचे वेगळे होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. दोघेही फॅमिली कोर्टात जाताना स्पॉट झाले आहे.
येणाऱ्या धमक्यांच्यामध्ये सलमानने ‘सिकंदर’चे शूटिंग कसे केले पूर्ण? मुरुगादोस यांनी केला खुलासा!
व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की क्रिकेटर युझवेंद्र चहल त्याच्या वकिलांसह कोर्टात पोहोचला आहे. त्याच्याभोवती अनेक वकील दिसत आहेत जे त्याला कोर्टात घेऊन जात आहेत. यावेळी, क्रिकेटपटू काळ्या टी-शर्ट, पँट आणि काळ्या जॅकेटमध्ये दिसला. त्याने तोंड लपविण्यासाठी तोंडावर मास्कही घातला आहे. दुसरीकडे, धनश्री वर्मा एका महिलेचा हात धरून न्यायालयात पोहोचली आहे. त्याच्यासोबत एक बॉडीगार्डही दिसत आहे. तिने देखील तोंडाला मास्क लागलेला दिसून येत आहे.
धनश्री वर्मानेही युझवेंद्र चहलसारखा मास्क घालून चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच दोघेही वेगवेगळे न्यायालयात येतेना दिसत आहेत. धनश्री वर्मा यांना पाहताच तिथे पापाराझींची गर्दी केली. धनश्री न्यायालयाबाहेर मीडियाने वेढलेली दिसत आहे. यादरम्यान, तिला पकडताना एक माणूस जमिनीवर पडतो आणि धनश्री तिथेच थांबते आणि त्याला सांभाळण्यास सांगते. यानंतर ती थेट कोर्टात जाताना दिसत आहे.
सुशीला – सुजीत मध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल “इतक्या” भूमिका निभावणार प्रसाद ओक!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात पोटगीबाबत एक करार झाला आहे. या करारानुसार, युझवेंद्र चहल धनश्री वर्मा यांना ४.७५ कोटी रुपये देणार आहेत. त्यापैकी त्याने २.३७ कोटी रुपयांचा पहिला हप्ता आधीच भरला आहे, तर उर्वरित रक्कम नंतर द्यावी लागणार आहे.
दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये केले लग्न
चहल आणि धनश्रीचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले. मात्र, दोघेही गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनीही यावर्षी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यासोबतच त्यांनी सहा महिन्यांच्या अनिवार्य कूलिंग पीरियडला सूट देण्याची मागणीही केली होती. तथापि, त्याची याचिका कुटुंब न्यायालयाने फेटाळून लावली. तथापि, आता उच्च न्यायालयाने हा निर्णय उलटवला आहे, ज्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.