(फोटो सौजन्य - अकाउंट)
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक ही मराठी चित्रपटसृष्टीतील दोन महत्वाची नावं आहे. दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचा प्रेक्षकवर्ग नेहमीपासूनच चाहता राहिला आहे. एकीकडे जिथे स्वप्नील नवनव्या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो तर दुसरीकडे प्रसाद ओक आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर कच्चा लिंबू, चंद्रमुखी, आणि हिरकणी सारखे चित्रपट सादर केले. आता हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांना एकत्र काम करताना दिसणार आहे. या दोघांचा ‘सुशीला – सुजीत’ हा चित्रपट येत्या १८ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
तुरुंगात सुरक्षित नव्हता आर्यन खान? ‘मी त्याला सिगारेट आणि पाणी दिले’, एजाज खानचा धक्कादायक खुलासा!
एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फार फार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो पण आगामी ‘सुशीला – सुजीत’ या चित्रपटामध्ये प्रसाद ओक एक दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रसाद ओक या चित्रपटाचं दिग्दर्शन तर करणार आहे पण सोबतीने बाकी काही खास भूमिका देखील निभावताना आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.
आजवर प्रसादने मराठी चित्रपट सृष्टीला अनेक सुपरहिट दमदार चित्रपट तर दिले आहेत. पण आगामी ‘सुशीला – सुजीत’ची प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे. “सुशीला – सुजीत” चित्रपटात प्रसाद करत असलेल्या तब्बल पाच भूमिका नक्की कोणत्या? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर प्रसाद या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे दिग्दर्शक आहे. सोबतीला तो या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाची कथा प्रसादचीच आहे. या चित्रपटाचा प्रसाद निर्माता सुद्धा आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटात प्रसादनी एक सुंदर गाणं देखील गायलं आहे.
येणाऱ्या धमक्यांच्यामध्ये सलमानने ‘सिकंदर’चे शूटिंग कसे केले पूर्ण? मुरुगादोस यांनी केला खुलासा!
एवढ्या सगळ्या भूमिका आणि त्या सुद्धा एकाच चित्रपटासाठी निभावणं ही खरंतर तारेवरची कसरत म्हणावी पण प्रसादने या सगळ्या भूमिका एकदम चोख पार पाडल्या आहेत. ज्या तुम्हा सगळ्यांना येत्या १८ एप्रिलला सिनेमा गृहात बघायला मिळतील. प्रसाद प्रत्येक सिनेमात काही न काही तरी वेगळा प्रयत्न करून प्रेक्षकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेच आता प्रेक्षकांना ‘सुशीला – सुजीत’ मध्ये काय वेगळं बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. एकाच चित्रपटात या अशा ५ भूमिका निभावणारा प्रसाद हा खरोखरच मराठीतला एक हरहुन्नरी कलाकार आहे असं म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही.