National Centre for the Performing Arts Mumbai
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘चौराहा – एक बहुभाषिक काव्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्य शासनातील कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ महिला अधिकारी कविता सादर करणार आहेत, अशी माहिती एनसीपीएच्या ग्रंथालय प्रमुख डॉ. सुजाता जाधव यांनी दिली. हा कार्यक्रम ७ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (National Centre for the Performing Arts- NCPA) येथे होणार आहे.
अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, “माझी प्रारतना” या नव्या मराठी सिनेमाचं पहिले पोस्टर रिलीज
कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी कविता सादर करणार आहेत.
‘एनसीपीए’च्या पहिल्या महिला संचालक विजया मेहता यांनी २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली असून, ही काव्यसंध्या ऐतिहासिक साहित्य उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक ठरणार आहे. ‘एनसीपीए’च्या “पेज टू स्टेज” या उपक्रमाचा एक भाग म्हणून, साहित्याला मंचावर सादर करण्याच्या संकल्पनेतून ‘चौराहा’ पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.