‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ (Madness Machaenge) हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. हा कॉमेडी शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या रविवारी या कार्यक्रमाात अभिनेता चंकी पांडेच्या उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये कुशल बद्रिके, गौरव दूबे आणि कावेरी प्रियम एक मस्त स्केच सादर करतील, ज्यात कुशल बद्रिके चंकी पांडेने उभी केलेली ‘आखरी पास्ता’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.यात तो एक कुक बनला आहे, जो किचनमधल्या गोष्टींना एक मसालेदार वळण देताना दिसेल! त्याचा हा अॅक्ट पाहून चंकी पांडे आणि ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशी त्याला स्टँडिंग ओव्हेशन देताना दिसतील.
[read_also content=”‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला; पोस्टर रिलीज, मराठी, हिंदी भाषेत होणार प्रदर्शित! https://www.navarashtra.com/movies/anjali-patil-sharib-hasmi-starrer-malhar-will-release-on-31-may-nrps-534370.html”]
काय म्हणाला कुशल
आपल्या या आगामी गॅगविषयी बोलताना कुशल बद्रिके म्हणला, “आखरी पास्ताची नक्कल करताना मी मनातून घाबरलो होतो कारण प्रत्यक्ष आखरी पास्ताच्या समोर मला ती नक्कल करायची होती. पण मला आनंद वाटतो, की चंकी पांडे जींना मी उभी केलेली त्यांची ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा आवडली! गौरव दूबे आणि कावेरी प्रियम सोबत काम करायला मजा आली. ते फार हुशार विनोदवीर आहेत. मंचावरच्या आमच्या केमिस्ट्रीमुळे गॅगची रंगत आणखी वाढली.”
कॅामेडीची ही धमाल ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाऐंगे या कार्यक्रमात या रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघायला मिळणार आहे.