Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ravindra Chavan : ज्येष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार; मुंबईत सिने वेलफेअर ट्रस्टच्या कार्याचा गौरव

Ravindra Chavan : जेष्ठ कलाकारांच्या अडचणी, आजारपण आणि गरजांसाठी कार्य करणाऱ्या सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टच्या उपक्रमांचे रविंद्र यांनी कौतुक केले. या संस्थेतर्फे केले जाणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2026 | 05:19 PM
जेष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार; मुंबईत सिने वेलफेअर ट्रस्टच्या कार्याचा गौरव

जेष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार; मुंबईत सिने वेलफेअर ट्रस्टच्या कार्याचा गौरव

Follow Us
Follow Us:
  • ज्येष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार
  • मुंबईत सिने वेलफेअर ट्रस्टच्या कार्याचा गौरव
  • दिलीप कुमार ते जॉनी लिव्हरपर्यंत दिग्गजांचा सन्मान
नीता परब, मुंबई :  अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपण सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहतो. या क्षेत्रात मिळणारा पैसा व माया यांची चर्चा आपण ऐकतो. पण प्रसिद्धीच्या पडद्याबाहेर गेल्यावर त्या कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असते ते आपल्याला कधीही दिसत नाही. अशा या जेष्ठ कलाकारांसाठी दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख यांसारख्या कलाकारांनी एकत्र येऊन जेष्ठ कलाकारांचे दुःख, त्यांच्या गरजा, त्यांचे आजारपण यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट  सारखा एक मंच तयार केला असून या संस्थेतर्फे केले जाणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुंबईत केले.

Rajashri Deshpande : “या खुणा नव्हे, हे तर मुकुट माझे!” Breast Cancer ला मात करून, अभिनेत्री काम करण्यासाठी Ready

सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने ज्या विश्वस्थ कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यामध्ये प्रामुख्याने सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख, अमरीश पुरी, अमजद खान, चंद्रशेखर वैद्य, दारासिंह या कलाकारांचा सन्मान करण्यासाठी त्या कलाकारांचे फोटो आणि माहिती देणाऱ्या फलकाचे उदघाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराचा एक प्रसिद्धीचा काळ असतो. तो चांगला काळ ओसरला की सरत्या काळात त्या कलाकारांकडे कुणी पाहत नाही. त्यांची कुणी चौकशी करत नाहीत. असे जवळपास ९ ते १० हजार कलाकार सध्या अभिनय क्षेत्रात आहेत. अशा कलाकारांचे दैनंदिन जीवन अतिशय हलाखीचे असते. यामध्ये अभिनय क्षेत्रात काम करणारे इतर कामगार यांची संख्या देखील मोठी आहे. याना सामाजिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती मला  सिने आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्ट च्या अध्यक्षा प्रीती सप्रू यांनी  दिली. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

तसेच जेष्ठ कलाकारांकरिता मी कोकणातील केसरी, सावंतवाडी येथील माझी स्वतःची एक एकर जागा देण्यास तयार आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.  या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रविंद्र चव्हाण यांच्या सोबत जेष्ठ अभिनेत्री प्रीती सप्रू, ट्रस्टच्या सचिव अभिनेत्री संभावना सेठ, संस्थेचे खजिनदार अभिनेते दीपक पराशर, बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव, मनोज जोशी, मुकेश ऋषी, आयुब खान, अभिनेत्री कुनिका आणि सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते.

“मी खूप लाजाळू…”, ‘Ek Din’ च्या निमित्ताने Aamir Khan ने केला खुलासा, उलगडला जुन्या आठवणींचा पिटारा

Web Title: Cine artist welfare trust mumbai ravindra chavan statement veteran artists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • india
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा
1

चीनला बसणार मोठा धक्का! India चा Brazil सोबत 30 अब्ज डॉलरचा Business Plan ; ‘या’ 5 क्षेत्रांना होणार मोठा फायदा

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
2

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार
3

Ethanol Petrol: पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? पावतीवर टक्केवारी नमूद करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?
4

India Petrol Export To Russia : रशियावर का आली अशी वेळ? भारताकडे मागतोय पेट्रोल! काय नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.