(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट जगभरात नाव कमावत आहे. परिस्थिती अशी आहे की हा पॅन इंडिया चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. पुष्पा 2 ने आत्तापर्यंत ‘RRR’, ‘जवान’, ‘स्त्री 2’, ‘Animal’ आणि ‘पठाण’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अवघ्या आठवडाभरातच हा पराक्रम घडला आहे. येत्या काही दिवसांत पुष्पा 2 चे वादळ किती राहणार आहे हे पाहणे उत्कंठाचे होणार आहे. मात्र, एक अशी जागा आहे जिथे अल्लू अर्जुनचा चित्रपट फ्लॉप ठरला आहे.
40 कोटींचे बजेट असलेला चित्रपटाने टाकले मागे
पॅन इंडिया चित्रपट पुष्पा 2 हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये चांगली कमाई करत असला तरी केवळ 40 कोटींच्या बजेटमध्ये कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या ‘बघीरा’ चित्रपटासमोर तो फ्लॉप ठरला आहे. हे आम्ही म्हणत नसून चित्रपटाचे कलेक्शनच हे सांगत आहे. या चित्रपटाने पुष्पराज ला चांगलीच टक्कर दिली आहे.
बघीरा ऑक्टोबरमध्ये रिलीज झाला
यावर्षी 31 ऑक्टोबर 2024 रोजी श्री मुरली आणि रुक्मिणी वसंत स्टारर चित्रपट ‘बघीरा’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशांत नील यांच्या कथेवर आधारित, डॉ. सुरी लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचे एकूण बजेट 40 कोटी रुपये आहे. कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर एकूण 2.55 कोटींची कमाई केली आहे. आणि हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. प्रेक्षकांनी सिनेमागृहात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील दिला.
बघीराचा पहिला वीकेंड कलेक्शन
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘बघीरा’ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 2.9 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 3.2 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 2.85 कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट केवळ 3.55 कोटी रुपये कमवू शकला तर त्याचे एकूण कलेक्शन 20.05 कोटी रुपये होते. या कमाईमुळे पुष्पा २ चित्रपट फ्लॉप ठरला आहे.
Tom Holland: ‘स्पायडर मॅन 4’ ची वाट पाहत आहात? चित्रपटाबाबत समोर आली खास बातमी!
पुष्पा 2 पहिला वीकेंड कलेक्शन
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या पुढे ‘पुष्पा २’ आपली जादू चालवू शकला नाही. अल्लू अर्जुनच्या कन्नड भाषेतील चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 1 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 65 लाख तर तिसऱ्या दिवशी 80 लाखांची कमाई केली. चौथ्या दिवशी 1.1 कोटी रुपयांच्या कमाईसह, पुष्पा 2 चे एकूण कलेक्शन केवळ 1.95 कोटी रुपये होते जे ‘बघीरा’ चित्रपटापेक्षा खूपच कमी आहे.