गायक आणि रॅपर बादशाहला (Badshah) महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं आहे. ‘फेअरप्ले’ नावाचं ॲप कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही आयपीएल दाखवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाय कॉमच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबरने ‘फेअरप्ले’वर (Fairplay) डिजिटल कॉपीराईटचा (Digital Copyright) गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी सांगितलं की, बादशाहने ‘फेअरप्ले’ची जाहिरात केली असल्याने त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं.
#WATCH | Maharashtra Police Cyber Cell is questioning rapper Badshah in Mumbai, in connection with the online betting company app ‘FairPlay’. pic.twitter.com/QAcEYqk7Ly
— ANI (@ANI) October 30, 2023
नुकतंच ANI नं यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये बादशाहचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर सेल पोलीस हे रॅपर बादशाहची ऑनलाइन बेटिंग कंपनी ॲप ‘फेअरप्ले’ संदर्भात मुंबईत चौकशी करत असल्याचं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे. बादशाह सोमवारी (30 ऑगस्ट) महाराष्ट्र सायबर कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला.
या प्रकरणी बॉलिवूडमधील 40 कलाकारांना समन्स बजावले जाऊ शकतं, असं पोलिसांनी सांगितलं आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही या ॲपचा प्रचार केला असून त्यालाही समन्स बजावले जाऊ शकते. सेलिब्रिटींना सामान्य लोक फॉलो करतात. त्यामुळे सेलिब्रिटी ज्या जाहिराती करत असतात त्याच्या परिणाम प्रेक्षकांवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. त्यामुळे शासनाने देखील अनेक कंपन्या आणि कलाकारांना नोटीस बजावली होती.
बादशाह सध्या ‘हसल’ आणि ‘इंडियाड गॉट टॅलेंट’ या शोचे परिक्षण करत आहे.