मुंबई – बॉलीवुडमधील सुपरहिट चित्रपट दंगल चित्रपटातील अभिनेत्रीचे निधन झाले आहे. अमीर खानच्या या चित्रपटामध्ये बालपणीच्या बबिता फोगाटचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाले. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सुहानीने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री सुहानी भटनागर हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. तिच्या शरीरात अतिरिक्त द्रव जमा होऊन तिचे दुर्देवी निधन झाले. सुहानीच्या अशा निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुहानीवर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी ( १६ फेब्रुवारी ) रात्री तिचं निधन झालं. शनिवारी फरीदाबाद येथे तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. दंगल चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर सुहानीने शिक्षणामुळे नाकारल्या होत्या. शिक्षणानंतर ती बॉलीवुडमध्ये काम करणार आहे असे तिने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले होते. मात्र वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सुहानी भटनागर हिने अखेरचा श्वास घेतला आहे.