Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सनम तेरी कसम’ला टक्कर देण्यासाठी येतोय शाहरुख खान- माधुरी दीक्षितचा ‘हा’ चित्रपट, ‘या’ दिवशी रिलीज होतोय सुपरहिट सिनेमा

सध्या बॉलिवूडमध्ये रि- रिलीज चित्रपट करण्याची तुफान क्रेझ आहे. पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. आता माधुरी दीक्षितचा २८ वर्षांपूर्वीचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 27, 2025 | 07:45 AM
'सनम तेरी कसम'ला टक्कर देण्यासाठी येतोय शाहरुख खान- माधुरी दीक्षितचा 'हा' चित्रपट, 'या' दिवशी रिलीज होतोय सुपरहिट सिनेमा

'सनम तेरी कसम'ला टक्कर देण्यासाठी येतोय शाहरुख खान- माधुरी दीक्षितचा 'हा' चित्रपट, 'या' दिवशी रिलीज होतोय सुपरहिट सिनेमा

Follow Us
Close
Follow Us:

सध्या बॉलिवूडमध्ये जुने चित्रपट रि- रिलीज करण्याची तुफान क्रेझ आहे. पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ चित्रपट ९ वर्षांनी पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘कहो ना प्यार है’, ‘रहेना है तेरे दिल मै’, ‘तुझे मेरी कसम’ असे अनेक चित्रपटही गेल्या काही महिन्यांपूर्वी पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आणि या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आता माधुरी दीक्षितचा २८ वर्षांपूर्वीचा एक चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला थिएटरमध्ये येणार आहे.

लेक अभिनेत्री, मुलगा दिग्दर्शक, आता अबराम होणार सिंगर; शाहरुख खानच्या मुलाचे टॅलेंट पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

३१ ऑक्टोबर १९९७ रोजी रिलीज झालेला ‘दिल तो पागल हैं’ चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी दीक्षितने शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. याशिवाय माधुरी आणि करिश्माचा एक डान्स फेस ऑफ सुद्धा प्रेक्षकांना यामध्ये पाहायला मिळाला होता. ९० च्या दशकामध्ये रिलीज झालेल्या ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटाला त्याकाळात अनेक नामांकित पुरस्कार मिळाले होते. त्यामध्ये,‘सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर’, ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ आणि ‘लोकप्रिय चित्रपट’ असे ३ राष्ट्रीय पुरस्कार तर, वेगवेगळ्या कॅटगरीमध्ये ८ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले होते. आपल्या काळात धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ह्या चित्रपटाने २८ वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हा चित्रपट सज्ज झालं आहे.

गोविंदा- सुनीता अहुजाचा घटस्फोट होणार ? अभिनेत्याच्या वकिलाने सर्व काही सांगून दिले

‘यशराज फिल्म्स’ने अधिकृत पोस्ट शेअर करत ‘दिल तो पागल हैं’ येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा येणार, अशी माहिती दिली आहे. यामध्ये माधुरी दीक्षित, शाहरुख खान, करिश्मा कपूर, अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. असंख्य नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत चित्रपट पाहण्यासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा हुसेन स्टारर ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाची जादू सध्या थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे. पण आता बॉलिवूडचा किंग शाहरुख स्वतः त्याच्या चित्रपटाशी स्पर्धा करण्यासाठी मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटगृहात परतल्यानंतर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कसा कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Dil toh pagal hai re release shah rukh khan madhuri dixit starrer movie to hit theaters on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • madhuri dixit
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

‘नो एंट्री 2’मध्ये सलग दुसरी मोठी एक्झिट, आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेताही बाहेर; नवीन जोडीदारांचा शोध सुरू!
1

‘नो एंट्री 2’मध्ये सलग दुसरी मोठी एक्झिट, आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेताही बाहेर; नवीन जोडीदारांचा शोध सुरू!

‘सैयारा’ अभिनेता अहान पांडेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केली मजा-मस्ती; चाहते म्हणाले ‘हा आहे खरा सुपरस्टार’
2

‘सैयारा’ अभिनेता अहान पांडेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केली मजा-मस्ती; चाहते म्हणाले ‘हा आहे खरा सुपरस्टार’

‘मी घरीही सुरक्षित नाही…’ संगीता बिजलानीने मागितला बंदुकीचा परवाना, ‘या’ कारणामुळे घाबरली अभिनेत्री
3

‘मी घरीही सुरक्षित नाही…’ संगीता बिजलानीने मागितला बंदुकीचा परवाना, ‘या’ कारणामुळे घाबरली अभिनेत्री

‘दोन्ही स्वप्न आज पूर्ण झाली…’ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक, म्हणाली…
4

‘दोन्ही स्वप्न आज पूर्ण झाली…’ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक, म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.