"...तोपर्यंत मी भारतात लाईव्ह कॉन्सर्ट करणार नाही" दिलजीत दोसांझचा धक्कादायक निर्णय
पंजाबी गायक, बॉलिवूड गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. सध्या संपूर्ण भारतात गायक त्याच्या ‘दिल-लुमिनाटी’ या म्युझिक लाईव्ह कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. या म्युझिक लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानच दिलजीतने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने घेतलेल्या निर्णयाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.
“…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची ‘ती’ इन्स्टा पोस्ट चर्चेत
दरम्यान, गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझने एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान भारतात त्याचे कॉन्सर्ट्स न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय घेतला त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिलजीतच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याने त्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंतीही केली जात आहे. दरम्यान, दिलजीतने हा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या भारतातील चाहत्यांना त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव घेता येणार नाही. व्हिडिओमध्येच गायकाने तो हा निर्णय का घेतोय ? याचंही स्पष्टीकरण स्वत: दिलं आहे.
करणवीर फिल्म्स नावाच्या फॅनने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेला हा व्हिडिओ चंढीगडमध्ये झालेल्या कॉन्सर्टमधला आहे. चंढीगडमधील कॉन्सर्टचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिलजीत दोसांझ म्हणतो, “मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की, जोपर्यंत आपल्या देशातील कॉन्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाही, तोपर्यंत मी भारतात पुन्हा म्युझिक कॉन्सर्ट करणार नाही. मुख्य म्हणजे, भारतात लाईव्ह शोसाठी साध्या पायाभूत सुविधा नाहीत. ही एक मोठी कमाईची जागा आहे. त्यातून अनेकांना रोजगारही मिळतो. कृपया तुम्ही या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे.”
प्रेमाचा बहर आणि हशांचा पाऊस करणार रंगमंच ‘हाऊसफुल’, नाटकाचा पहिला प्रयोग कधी होणार ?
दिलजीतने पुढे व्हिडिओमध्ये म्हटलंय की, “मी स्टेजच्या मध्यभागी उभा राहण्याचा प्रयत्न करेन पण त्याभोवती बरीच गर्दी पसरली आहे. इथली परिस्थिती सुधारेपर्यंत मी इथे शो करणार नाही. आम्हाला त्रास देण्याऐवजी पायाभूत सुविधा सुधारा.” दरम्यान, काही दिवसांपूर्वी गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टची तिकिटं चढ्या किमतीत विकल्या गेल्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. तर अनेकांनी पंजाबी अभिनेता-गायकावर त्यांच्या कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोपही केला आहे. भारतातील दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पंजाबी सुपरस्टारने दिल्लीहून आपल्या ‘दिल लुमिनाटी’