येत्या काही दिवसात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम आणि राजस्थानचा समावेश आहे. या पार्श्वभुमीवर भारतीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) तयारी करण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून अभिनेता राजकुमार रावची (Rajkummar Rao) नॅशनल आयकॉन (National Icon) म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी त्याची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात येईल.
[read_also content=”चीनमध्ये आढळले 8 नवीन विषाणू! शास्त्रज्ञांची वाढली चिंता, दिला ‘हा’ इशारा https://www.navarashtra.com/world/new-8-virus-found-in-china-nrps-473776.html”]
गेल्या काही दिवसापासून सातत्याने चित्रपटात झळकणारा चेहरा म्हणजे राजकुमार राव याची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. उद्या (26 ऑक्टोबरला) या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येईल. आता विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन करताना अभिनेता दिसणार आहे.
‘या’ राज्यांमध्ये होणार निवडणुका
विधानसभेच्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि तेलंगणामध्ये (Telangana) 17 आणि 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) आधी 23 नोव्हेंबरला मतदान होणार होते. पण आता ते 25 नोव्हेंबरला होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून नॅशनल आयकॉन म्हणून निवड झालेल्या सेलिब्रिटींना लोकांना मतदानाबाबत जागरूक करण्याची जबाबदारी देण्यात येते. त्यांच्या सांगण्यावरुन जास्तीत जास्त मंडळी मतदान करतात. राजकुमारआधी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला आपला नॅशनल आयकॉन बनवण्यात आले होते. भारतात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अधिकाधिक लोकांनी मतदानात सहभागी व्हावे अशी निवडणूक आयोगाची इच्छा आहे. यासाठी तरुण अभिनेत्याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडले आहे.